शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:22 IST

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:४४ वाजता सर्व अंतराळवीर अंतराळ स्थानकात उतरले.

Axiom-4 Mission: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दाखल झाले आहेत. अंतराळ स्थानकात दाखल झाल्यानंतर, तेथील क्रू मेंबर्सनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. या अंतराळवीरांचा ISS मध्ये पोहोचल्यानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे.

अंतराळ स्थानकात उत्साहत स्वागत - भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:४४ वाजता सर्व अंतराळवीर अंतराळ स्थानकात उतरले. यावेळी तेथील क्रू मेंबर्सनी अ‍ॅक्सिओम-४ मिशन कमांडर पेगी व्हिटसन यांचे स्वागत केले. मिशन पायलट शुभांशू शुक्ला व्हिटसन यांच्या मागे होते. शुक्ला यांच्यासोबत पोलिश अभियंता स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की होते, ते मिशन स्पेशालिस्ट आणि युरोपियन स्पेस एजन्सी प्रकल्पाचे अंतराळवीर आहेत.

एक्सिओम मिशन-4 संदर्भात नासा -पाचव्यांद अंतराळ उड्डाण केलेल्या व्हिटसन म्हणाल्या, "येथे येऊन आम्ही अत्यंत आनंदी आहोत. एकांतात राहण्याचा हा मोठा कालावधी होता." एखादी भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (नासा) एका निवेदनात म्हटले आहे की,  "स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान, अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत, चौथ्या खाजगी अंतराळवीर मोहिमेसाठी गुरुवार (२६ जून २०२५) सकाळी ६:३१ वाजता (भारतीय वेळेनुसार ४:०१ वाजता)आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले."

शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. यापूर्वी, भारताचे राकेश शर्मा १९८४ मध्ये आठ दिवस अंतराळात राहिले होते. 

टॅग्स :NASAनासाisroइस्रोSpaceअंतरिक्ष