शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:34 IST

या दुर्दैवी घटनेत चमत्कारिकरित्या तीन महिन्यांची चिमुकली वाचली.

'देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती पाकिस्तानातील एका घटनेतून येते. कराचीमध्ये पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी २० जण एकाच हिंदू कुटुंबातील होते. ही दुर्घटना इतकी मोठी होती की, सुमारे ५३ तास बचावकार्य चालले. विशेष म्हणजे, या घटनेत तीन महिन्यांची चिमुकली चमत्कारिकरित्या वाचली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाच मजली इमारत कशी पडली?मीडिया रिपोर्ट्सनुसार, बचावकार्यात २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यापैकी २० जण एकाच कुटुंबातील होते. या अपघातानंतर, एवढा मोठा अपघात का झाला आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, असे प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप यामागील कारणाबद्दल काहीही सांगितलेले नाही. सिंध सरकारचा दावा आहे की, लियारीमधील सुमारे २२ जीर्ण इमारतींपैकी १४ इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. ही कोसळलेली इमारत जीर्ण असल्याचेही म्हटले जाते.

तीन महिन्यांच्या मुलीचे प्राण कसे वाचले?२७ जणांचा जीव घेणाऱ्या अपघातातून तीन महिन्यांची मुलगी चमत्कारिकरित्या वाचली आहे. बचाव कर्मचारी मजहर अली यांनी बीबीसीला सांगितले की, जेव्हा ते आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ढिगाऱ्याखालून एकएक करत मृतदेह बाहेर काढत होते. यावेळी त्यांना लहान मुलाचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ ढिगारा बाजुला काढला असता, त्यात तीन महिन्यांची मुलगी जिवंत आढळली. तर, तिच्या आईसह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघातBuilding Collapseइमारत दुर्घटनाHinduहिंदू