शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची मंत्री गोयल यांनी घेतली भेट; भागीदारी अधिक बळकट करण्यावर भर

By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2025 10:04 IST

गोयल यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष संदेश नेतन्याहू यांना दिला.

अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई 

जेरुसलेम : भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप करताना इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांची स्वतंत्र भेट घेतली. दोन्ही बैठकींमध्ये भारत–इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

गोयल यांनी सर्वप्रथम इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांची भेट घेऊन भारतीय जनतेच्या शुभेच्छा त्यांना कळवल्या. या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान–तंत्रज्ञान, नवोपक्रम, तसेच व्यापक आर्थिक सहकार्यासंदर्भातील विषयांवर सखोल चर्चा झाली. गोयल यांनी इस्रायली भागीदारांसाठी भारतातील वाढत्या संधींचा उल्लेख करताना, भारत–इस्रायल मुक्त व्यापार करार चर्चांच्या दिशेने उचललेल्या पहिल्या मोठ्या पावलाची माहिती दिली.

यानंतर गोयल यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष संदेश नेतन्याहू यांना दिला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, पाणी व्यवस्थापन आणि नवोपक्रम क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावरील दिशा निश्चित केली. 

सहकार्याला नवी चालनाभारताचे कौशल्य व इस्रायलची उच्च तंत्रज्ञान क्षमता एकत्र येऊन नवोपक्रम भागीदारीला मोठा वेग मिळू शकतो, असेही गोयल यांनी सोशल मीडियावर नमूद केले. गोयल यांच्या या भेटींमुळे दोन्ही देशांतील आर्थिक, तांत्रिक आणि रणनीतिक सहकार्याला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भागीदारी अधिक बळकट करू नेतन्याहूपंतप्रधान नेतन्याहू यांनीही गोयल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत ट्विट करून भारत–इस्रायल भागीदारी अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. भारत, इस्रायल आणि त्यानंतर युरोपपर्यंत जाणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरच्या संकल्पनेलाही त्यांनी महत्त्वाचे पाऊल म्हटले. उभय देशांतील आर्थिक संबंधही वाढीला लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Goyal Meets Israeli Leaders, Focus on Stronger Partnership

Web Summary : Piyush Goyal concluded his Israel visit, meeting the President and Prime Minister. Discussions centered on strengthening strategic ties, trade, investment, and technology. Both leaders emphasized enhanced cooperation across sectors, foreseeing boosted economic and technical collaboration. A new economic corridor was also discussed.
टॅग्स :Israelइस्रायलIndiaभारतpiyush goyalपीयुष गोयल