इस्लामाबाद : गुप्त लष्करी न्यायालये कायदेशीर असून नागरिकांना देहान्ताची शिक्षा ठोठावू शकतात, असे सांगत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या न्यायालयांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका बुधवारी फेटाळून लावल्या. या निर्णयामुळे लष्कराची सत्तेवरील पकड आणखी घट्ट होणार आहे. तालिबान दहशतवाद्यांनी डिसेंबरमध्ये लष्करी शाळेवर हल्ला करून १३४ मुलांना ठार मारल्यानंतर पाक सरकारने संशयित दहशतवाद्यांवर खटला चालविण्याचे अधिकार लष्करी न्यायालयांना बहाल केले होते. नागरी न्यायालये दहशतवाद्यांना दोषी ठरविण्यास घाबरतात, असा युक्तिवाद करत हे खटले सरकारने लष्करी न्यायालयाकडे वर्ग केले होते.
पाकमधील लष्करी न्यायालये वैधच!
By admin | Updated: August 5, 2015 23:08 IST