गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, "लवकरात लवकर मदत करणं आवश्यक"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:29 IST2023-11-27T17:22:01+5:302023-11-27T17:29:06+5:30
इस्रायली सैन्याने रविवारी रात्री उशिरा गाझामधील हमासच्या कैदेतून 17 ओलिसांची सुटका केली, ज्यात 14 इस्रायली आणि तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

फोटो - AP
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या 50 दिवसांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. याच दरम्यान, युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) च्या प्रमुख सिंडी मॅक्केन यांनी गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचा इशारा दिला आहे. कारण हा प्रदेश इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील संघर्षाच्या परिणामांनी ग्रासलेला आहे.
CBS न्यूजशी बोलताना, मॅक्केन यांनी गाझामध्ये मानवतावादी मदत वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी इशारा दिला की, उपासमारीने संघर्षग्रस्त पट्ट्यात आजार आणि इतर विनाशकारी परिणाम होऊ शकतात. युनिसेफच्या अलीकडील डेटाबद्दल विचारले असता, मॅक्केन यांनी उत्तर दिलं की गाझामधील मुलांमध्ये गंभीर कुपोषण जवळपास 30 टक्क्यांनी वाढू शकतं. या भागात आपण कदाचित उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत.
युद्धविरामापासून, WFP अंदाजे 110,000 लोकांना अन्न पुरवण्यात यशस्वी ठरलं आहे. परंतु मॅक्केन यांनी यावर जोर दिला की, संकटं दूर करण्यासाठी आणखी बरंच काही करणं आवश्यक आहे. ही एक मोठी विध्वंसक घटना आहे. ज्या लोकांना अन्न देणं आवश्यक आहे, त्यांना आम्ही सुरक्षितपणे खायला देऊ शकतो हे आम्हाला सुनिश्चित करावे लागेल असंही म्हणाले.
इस्रायली सैन्याने रविवारी रात्री उशिरा गाझामधील हमासच्या कैदेतून 17 ओलिसांची सुटका केली, ज्यात 14 इस्रायली आणि तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पहिल्या वेळेस, शुक्रवारी 24 ओलिसांची सुटका करण्यात आली, त्यानंतर शनिवारी आणखी 17 ओलिसांची सुटका करण्यात आली. याच दरम्यान, द टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे की, मदत घेऊन जाणारे 200 ट्रक गाझा पट्टीत दाखल झाले आहेत.