Middle East Crisis: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने गंभीर इशारा दिला आहे. या युद्धामुळे ऊर्जा क्षेत्रासोबतच जागतिक पुरवठा साखळी, वाहतूक, विमा खर्च आणि उत्पादन खर्च यावर मोठा परिणाम होत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
आयएमएफच्या मते, या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर, विशेषतः आशिया आणि युरोप या प्रदेशांवर होणार आहे. इंधन आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे महागाई वाढेल आणि आर्थिक विकास मंदावेल, असा इशारा देण्यात आला आहे.
ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम
आयएमएफने सांगितले की, जगातील सुमारे 2५ ते ३० टक्के कच्चे तेल आणि २० टक्के एलएनजी (LNG) हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून वाहतूक होते. हा मार्ग बंद किंवा धोक्यात आल्यास ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होतो. यामुळे आशिया आणि युरोपमधील ऊर्जा आयात करणारे देश जास्त प्रभावित होऊ शकतात. आफ्रिका आणि आशियातील गरीब देशांवर याचा अधिक दबाव पडू शकतो. कमी आर्थिक साठा असलेल्या देशांनावरही मोठे संकट ओढवू शकते.
पुरवठा साखळीवर परिणाम
या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे वाहतूक आणि विमा खर्च वाढला आहे तसेच माल पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे उद्योग आणि उत्पादन क्षेत्रावरही दबाव वाढत आहे. आशियातील मोठ्या उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये वीज आणि इंधन महाग झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून लोकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होत आहे.
युरोपमध्ये गॅस संकटासारखी परिस्थिती
युरोपमध्ये २०२१-२२ च्या गॅस संकटासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही आयएमएफने म्हटले आहे. इटली आणि युनायटेड किंगडम यांसारखे देश जास्त प्रभावित होऊ शकतात, तर फ्रान्स आणि स्पेन हे अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमुळे तुलनेने सुरक्षित आहेत. या संघर्षाचा परिणाम वित्तीय बाजारांवरही दिसत आहे. जागतिक शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे, बॉन्ड यिल्ड वाढली आहे आणि बाजारातील अस्थिरता वाढली आहे. जरी परिस्थिती मोठ्या जागतिक आर्थिक संकटासारखी नसली तरी आर्थिक परिस्थिती अधिक कठीण होत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, अनिश्चित जागतिक परिस्थितीत अनेक देशांना आर्थिक मदतीची गरज भासू शकते आणि आयएमएफ त्यांना मदत करण्यास तयार आहे. एकूणच, मिडल ईस्टमधील युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून पुढील काळात महागाई वाढ, आर्थिक विकासात मंदी आणि ऊर्जा संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : IMF warns the Middle East conflict imperils global economy. Energy disruptions, supply chain issues, and rising costs threaten growth, especially in Asia and Europe. Inflation and financial market instability are predicted.
Web Summary : आईएमएफ ने चेतावनी दी है कि मध्य पूर्व संघर्ष वैश्विक अर्थव्यवस्था के लिए खतरा है। ऊर्जा व्यवधान, आपूर्ति श्रृंखला मुद्दे और बढ़ती लागतें विकास को खतरे में डालती हैं, खासकर एशिया और यूरोप में। मुद्रास्फीति और वित्तीय बाजार अस्थिरता की भविष्यवाणी की गई है।