शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील युद्धात हूती गटाची एन्ट्री; इस्रायलवर केले क्षेपणास्त्र हल्ले, हूती नेमके आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 15:57 IST

Middle East Crisis: इराणच्या मदतीला आलेला हूती गट कोणाचा आहे? इस्रायलवर हल्ले का करतोय?

Middle East Crisis: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात आता यमनमधील हूती गटानेही एन्ट्री घेतली असून, त्यांनी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करून हूती गटाने या युद्धात सहभागी झाल्याची घोषणा केली. त्यामुळेच आता या संघर्षात आणखी एक नवा अध्याय जोडला गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

हूती गट कोण आहे?

हूती हा यमनमधील एक राजकीय आणि लष्करी गट आहे, जो 2000 च्या दशकात उदयास आला. या गटाचे नाव त्याचे संस्थापक हुसेन अल-हूती याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. सध्या हा गट उत्तर यमनच्या मोठ्या भागावर नियंत्रण ठेवतो. हूती गटाला इराणचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. इराणने या गटाला आधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान दिले असून, आता हूती गट स्वतःही यमनमध्ये शस्त्रनिर्मिती आणि असेंब्ली करण्यास सक्षम झाला आहे.

व्हेनेझुएला अन् इराणनंतर क्यूबा अमेरिकेच्या निशाण्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने तणाव वाढला

2014 मध्ये हूती गटाने यमनची राजधानी सना ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त सरकारविरुद्ध भीषण गृहयुद्ध सुरू झाले. या युद्धात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली हवाई हल्ले करण्यात आले होते, ज्याला अमेरिकेचेही समर्थन होते. या संघर्षात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिका आणि हूती संघर्ष

जानेवारी 2024 मध्ये अमेरिकेने लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय जहाजांवर हूती हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात यमनमध्ये हवाई हल्ले केले होते. तरीही हूती गटाच्या कारवाया थांबल्या नाहीत. 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक हल्ले सुरू केले. त्यानंतर मे 2025 मध्ये अमेरिका आणि हूती गटामध्ये एक करार झाला, ज्यामध्ये हूती गटाने जहाजांवरील हल्ले थांबवले, तर अमेरिका हवाई हल्ले थांबवेल असे ठरले. मात्र, इस्रायलवरील हल्ले थांबवण्याचा या करारात समावेश नव्हता.

या युद्धात हूती गट महत्त्वाचा का?

आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, हूती गटाने लाल समुद्रात जागतिक समुद्री व्यापारावर मोठा परिणाम केला होता. नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2025 दरम्यान हूती गटाने 100 पेक्षा अधिक व्यापारी जहाजांवर हल्ले केले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हूती गटाचे हल्ले फक्त इस्रायलपुरते मर्यादित राहिले, तर युद्धावर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही, कारण इस्रायलची अँटी-मिसाइल प्रणाली क्षेपणास्त्र आणि ड्रोन रोखण्यास सक्षम आहे.

मात्र, जर हूती गटाने पुन्हा लाल समुद्रात जहाजांवर हल्ले सुरू केले आणि बाब-अल-मंदाब सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केला, तर जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. लाल समुद्र आणि बाब-अल-मंदाब मार्ग हा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील सुमारे 15% समुद्री व्यापार या मार्गाने होतो. कंटेनर जहाज वाहतुकीपैकी सुमारे 30% वाहतूक या मार्गावरून होते, तर युरोप आणि आशिया दरम्यानचा 12-15% व्यापारही याच मार्गाने होतो. जर हा मार्ग बंद झाला, तर जहाजांना आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप मार्गे वळसा घालावा लागेल. त्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Houthi Entry into Middle East Conflict: Who are they?

Web Summary : Yemen's Houthi group entered the Middle East conflict, attacking Israel. The Iran-backed group controls northern Yemen and threatens global trade routes in the Red Sea, impacting the global economy.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू