एमएच 370 : बेपत्ता विमानातून एका व्यक्तीचा लपून प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 08:49 AM2018-08-11T08:49:16+5:302018-08-11T10:46:02+5:30

मलेशियन एअरलाइन्सचे विमान 8 मार्च 2014 ला क्वालालंपूरहून पेचिंगला जात असताना बेपत्ता

MH 370: Hiding a person in a hiding airplane? | एमएच 370 : बेपत्ता विमानातून एका व्यक्तीचा लपून प्रवास?

एमएच 370 : बेपत्ता विमानातून एका व्यक्तीचा लपून प्रवास?

Next

लंडन : मलेशियाच्या 2014 मध्ये गुढरित्या बेपत्ता झालेल्या एमएच 370 या विमानाबाबतचा अंतिम अहवाल नुकताच दाखल करण्यात आला. मात्र, तरीही या विमानाचा शोध सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या विमानातून कोणीतरी लपून प्रवास करत होते, असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे. 


 मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग 777 हे विमान 8 मार्च 2014 ला क्वालालंपूरहून पेचिंगला जात होते. या विमानात 227 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. हे विमान अर्ध्यातच बेपत्ता झाले होते. गेल्या चार वर्षांत व्यापक प्रमाणात दोनवेळा राबविलेल्या शोधमोहिमांना हिंदी महासागराच्या तळाशी विमानाचे काही अवशेष मिळाले होते. 


  मलेशियाच्या 19 सदस्यीय समितीने नुकताच या घटनेचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. तसेच वैमानिकांचे वागणेही संशयास्पद नव्हते. मात्र, या विमानाचा शोध घेण्यास अपयश आल्याचे यात म्हटले आहे. मात्र, या अहवालावर जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कारण, या अहवालामध्ये दुसऱ्या शक्यतांवर कोणताही विचार केलेला नाही. कोणीही अधिकारी या विमानातून एखादी व्यक्ती लपून प्रवास करत असेल यावर लक्ष देण्यास तयार नाही. 


 विमानामध्ये एकापेक्षा जास्त जण वाईट हेतूने विमानात बसले किवा लपले असतील. 'दी इंडिपेंडंट' नुसार हे विमान क्वालालंपूर मध्ये थांबलेले असताना त्याच्या मागील भागात काहीजण लपले असतील. याकडे विमान दुर्घटनेच्या आठवड्यातच लक्ष वेधले होते. या शक्यतेवर विचारच केला गेलेला नाही असे 'दी इंडिपेंडंट'चे बाम सांगितले. 


 आतापर्यंत जगभरात 107 विमानांमधून 123 प्रवाशांनी लपून यात्रा केल्याचे आढळले होते. बरेच जण चाकांमधील जागेमध्ये लपतात. तर काहीजण सफाई कर्मचारी, विमानतळ अधिकाऱ्याच्या वेशामध्ये प्रवास करत होते. 

Web Title: MH 370: Hiding a person in a hiding airplane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.