मुलाची वाट बघत असताना हल्लेखोरांनी झाडल्या अभिनेत्री गोळ्या, २०१० मध्ये होतं तिचं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:14 IST2021-12-17T17:13:01+5:302021-12-17T17:14:58+5:30
Mexican Actress Murder : अभिनेत्रीच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत असून हल्लोखोरांची काहीच माहिती मिळाली नाही.

मुलाची वाट बघत असताना हल्लेखोरांनी झाडल्या अभिनेत्री गोळ्या, २०१० मध्ये होतं तिचं अपहरण
मेक्सिको (Mexico) मध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या यादीत आता एका अभिनेत्रीचंही नाव जोडलं गेलं आहे. मोरेलोसमध्ये एका मेक्सिकन अभिनेत्री आणि गायिकेची गोळ्या झाडून हत्या (Mexico Actress Murder) करण्यात आली आहे. एका फुटबॉल अकॅडमीबाहेर अभिनेत्री तिच्या ११ वर्षीय मुलाची वाट बघत असताना तिच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. अभिनेत्रीच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत असून हल्लोखोरांची काहीच माहिती मिळाली नाही.
मुलाची वाट बघत होती अभिनेत्री
'बीबीसी'च्या रिपोर्टनुसार, मेक्सिकन अभिनेत्री तानिया मेंडोजा (Tania Mendoza) गेल्या मंगळवारी मोरेलोसच्या कुर्नवाका शहरातील फुटबॉल अकॅडमीत मुलाला घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे इतर पालकही त्यांच्या मुलाची वाट बघत होते. तेव्हाच दोन हल्लोखोर आले आणि त्यांनी अभिनेत्रीवर गोळीबार केला. तिथून पळून जाण्याआधी त्यांनी अनेकदा अभिनेत्रीवर गोळ्या झाडल्या.
मेक्सिकोमध्ये महिलांची हत्या ठरवून करणं ही एक मोठी समस्या बनली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी कमीत कमी १० महिलांची हत्या झाली आहे. मानवाधिकार समूह एमनेस्टी इंटरनॅशनलने सांगितलं की, पीडितांपैकी जवळपास प्रत्येक तिसऱ्या महिलेची हत्या ही त्यांच्या जेंडरमुळे झाली आहे. म्हणजे मुद्दामहून महिलांची हत्या केली गेली.
२००५ मध्ये मिळाली होती ओळख
तानिया मेंडोजा ४२ वर्षीय होती. २००५ मध्ये आलेल्या 'ला मेरा रेयना डेल सुर' सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली होती. अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं होतं. अलिकडच्या काही वर्षात तानिया एका गायिका म्हणून नावारूपाला आली होती. तिने पाच अल्बमही रेकॉर्ड केले होते.
२०१० मध्ये झालं होतं तिचं अपहरण
२०१० मध्ये तानियाचं तिचा पती आणि मुलासोबत अपहरण करण्यात आलं होतं. तेव्हापासून अभिनेत्रीने मोरेलोस स्टेट अटॉर्नी जनरल कार्यालयात हत्येच्या धमकीची तक्रार दाखल केली होती.