मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 07:49 IST2025-12-26T07:46:48+5:302025-12-26T07:49:59+5:30
अमेरिकेच्या सैन्याने नायजेरियात असलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या तळांना लक्ष्य केले आहे, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
अमेरिकी सैन्याने गुरुवारी रात्री नायजेरियात दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या तळांवर हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया साइटवर पोस्ट करून याची माहिती दिली. ऑक्टोबरमध्येच त्यांनी नायजेरियातील दहशतवाद्यांवर ख्रिश्चनांची हत्या केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासूनच हल्ल्याचा इशारा देत असलेल्या ट्रम्प यांनी म्हटले होते की नायजेरियन सरकार हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरली आहे, अशा परिस्थितीत जर अमेरिका त्यांचे संरक्षण करत नाही तर हा नायजेरियातील ख्रिश्चनांसाठी अस्तित्वाचा धोका असेल.
कुख्यात गणेश उईकेसह ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
ट्रुथ सोशल या सोशल मीडिया साइटवर ट्रम्प यांनी हल्ल्याची माहिती दिली. युद्ध विभागाने केलेली कारवाई क्रूर आणि निर्दयीपणे मारल्या गेलेल्या ख्रिश्चनांसाठी होती. आज रात्री, कमांडर इन चीफ म्हणून माझ्या निर्देशानुसार, अमेरिकेच्या सैन्याने नायजेरियातील आयसिसच्या ठिकाणांवर एक शक्तिशाली आणि प्राणघातक हल्ला केला. हे दहशतवादी प्रामुख्याने निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करत होते, असंही ट्रम्प यांनी लिहिले आहे.
आफ्रीकन कमांडनेही हल्ल्याची माहिती दिली
अमेरिकन लष्कराच्या आफ्रिकन कमांडनेही हवाई हल्ल्याची माहिती दिली. हा हल्ला नायजेरियन सरकारच्या विनंतीवरून करण्यात आला. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले. अमेरिका कधीही कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला वाढू देणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले.
"मी या दहशतवाद्यांना आधीच इशारा दिली आहे. जर ख्रिश्चनांची कत्तल थांबवली नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल आणि आज तेच घडले आहे. युद्ध विभागाने अनेक उत्कृष्ट हल्ले केले, हे फक्त अमेरिकाच करू शकते. माझ्या नेतृत्वाखाली, आपला देश कधीही कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला वाढू देणार नाही. देव आपल्या सैन्याला आशीर्वाद देवो आणि शहीद दहशतवाद्यांसह सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा देतो," असेही ट्रम्प यांनी लिहिले.