शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कधीच सोडून न जाणारी ‘गर्लफ्रेंड’ मिळणार, मोजावे लागणार फक्त १.५ कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:51 IST

एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. त्याची वैशिष्ट्ये मानवासारखी आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे. 

लास वेगास : सध्याच्या तरुणांना गर्लफ्रेंड असणे, ही मिरवण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होते असे नाही. त्यातून मग ब्रेकअपला सामोरे जावे लागते; पण आता ब्रेकअपचा त्रास संपला! एआयने ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ या तुमच्यासाठी बनवली आहे.एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. त्याची वैशिष्ट्ये मानवासारखी आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे. 

‘आरिया’साठी किती खर्च करावा लागेल?कंपनीने आरियाच्या तीन आवृत्त्या लाँच केल्या आहेत. एका प्रकारात, फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध असेल. यासाठी १०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ८ लाख ६० हजार रुपये खर्च करावे लागतील. दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे. त्याची किंमत १ कोटी २९ लाख रुपये आहे. तर तिसरा पर्याय पूर्ण आकाराचे मॉडेल आहे, ज्याची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये आहे. 

निर्मिती कशासाठी? : एकाकीपणा दूर करणे, एक रोमँटिक साथीदार म्हणून ही निर्मिती केल्याचे रिअलबोटिक्सचे सीईओ अँड्र्यू किगुएल यांनी दिली. 

‘आरिया’ची वैशिष्ट्ये कोणती? अमेरिकन कंपनी रिअलबोटिक्सने यावर्षी हा एआय रोबोट लास वेगासमधील २०२५च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच केला आहे. ही कंपनी जिवंत माणसांसारखी सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्ये असलेले रोबोट तयार करते. आरियाच्या संपूर्ण शरीरात १७ मोटर्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते. आरियाचा चेहरा, केसांचा रंग आणि केशरचनादेखील कस्टमाइज करता येते.रोबोट्समध्ये आर.एफ.आय.डी. टॅग्ज जोडलेले आहेत, ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज लावू शकते. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सRobotरोबोटInternationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञान