महिला पोलीस अधिकाऱ्याने 7 पोलीस सहकाऱ्यांसोबत ठेवले संबंध, रंगेहाथ पकडली गेली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:34 IST2023-01-11T13:34:09+5:302023-01-11T13:34:25+5:30

US Crime : ही घटना अमेरिकेच्या टेनेसी पोलीस स्टेशनमधील आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव मेगन हॉल असं आहे. ती सात पोलीस सहकाऱ्यांसोबत संबंध ठेवताना पकडली गेली.

Married female officer fired after making relations with 7 cops | महिला पोलीस अधिकाऱ्याने 7 पोलीस सहकाऱ्यांसोबत ठेवले संबंध, रंगेहाथ पकडली गेली आणि मग...

महिला पोलीस अधिकाऱ्याने 7 पोलीस सहकाऱ्यांसोबत ठेवले संबंध, रंगेहाथ पकडली गेली आणि मग...

US Crime : एका महिला पोलीस अधिकाऱ्याने असा गुन्हा केला ज्यानंतर केवळ पूर्ण पोलीस विभागच नाही तर देशही हैराण झाला आहे. आरोप समोर आल्यानंतर महिलेविरोधात चौकशी केली गेली. त्यानंतर तिला नोकरीहून काढण्यात आलं. या महिला पोलीस अधिकाऱ्याने अनेक पुरूष सहकाऱ्यांसोबत ड्युटीवर असताना संबंध ठेवले. सोबतच एकमेकांना अश्लील फोटोही पाठवले. याचा खुलासा झाल्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत इतरही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

ही घटना अमेरिकेच्या टेनेसी पोलीस स्टेशनमधील आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव मेगन हॉल असं आहे. ती सात पोलीस सहकाऱ्यांसोबत संबंध ठेवताना पकडली गेली. गुन्ह्याची गंभीरता बघता हॉलसोबत इतर चार कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढण्यात आललं. इतर ती कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ला वर्गेनचे मेयर जेसन कोल यांना कुणीतरी मेगन हॉलबाबत सूचना दिली होती. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली.

डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या चौकशीतून समोर आलं की, हॉलने तिच्या पोलीस सहकाऱ्यांसोबत पोलीस स्टेशन, पार्ट्या आणि हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले. तिने त्यांच्यासोबत इतरही अश्लील गोष्टी केल्या. नोकरीहून काढण्यात आल्यावर एका पोलिसाची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने सगळं काही सांगितलं. हॉल ही स्वत: विवाहित आहे आणि पतीने तिला दुसऱ्या एका व्यक्तीसोबत पकडलं होतं.  त्यानंतर धागे जुळत गेले. ज्या ज्या अधिकाऱ्याचं नाव समोर आलं त्यांची चौकशी केली गेली. 

याबाबत जेव्हा हॉलची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने सहकाऱ्यांसोबत संबंध ठेवल्याचं मान्य केलं. ती हेही म्हणाली की, ती ओपन मॅरेजमध्ये आहे. दोषी पोलिसांपैकी एक म्हणाला की, त्याला मेगन हॉलच्या मानसिक स्थितीबाबत चिंता आहे. तो म्हणाला की, हॉल फार जास्त दारू पिते आणि वेगाने गाडी चालवते. 

Web Title: Married female officer fired after making relations with 7 cops