लय भारी! लग्नानंतर नशीब फळफळलं, हनीमूनऐवजी 'हे' काम केलं अन् दाम्पत्य कोट्यधीश झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:08 IST2021-10-13T11:59:47+5:302021-10-13T12:08:15+5:30
Man wins 1 million dollar lottery jackpot : एका दाम्पत्याने हनीमून ऐवजी एक दुसरं काम केलं आणि त्यांचं आयुष्यचं बदललं आहे. ते कोट्यधीश झाले असून तब्बल 8 कोटींचे मालक झाले आहेत.

लय भारी! लग्नानंतर नशीब फळफळलं, हनीमूनऐवजी 'हे' काम केलं अन् दाम्पत्य कोट्यधीश झालं
एखाद्या व्यक्तीचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना एका दाम्पत्यासोबत घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चारच दिवसांत आणि वयाच्या साठाव्या वर्षी त्यांचं नशीब फळफळं आहे. लग्नानंतर नवं दाम्पत्य हे प्रामुख्याने बाहेर फिरायला जाण्याचा, हनीमूनचा विचार करतं. त्यासाठी खास प्लॅनिंग करतं पण एका दाम्पत्याने हनीमून ऐवजी एक दुसरं काम केलं आणि त्यांचं आयुष्यचं बदललं आहे. ते कोट्यधीश झाले असून तब्बल 8 कोटींचे मालक झाले आहेत.
अमेरिकेत राहणाऱ्या 60 वर्षीय मायकल एबरनेथी यांचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. ज्याची त्यांनी कल्पना देखील कधी केली नव्हती, इतका मोठा आनंदाचा धक्का त्यांना बसला आहे. उत्तर कॅरोलिनातील या दाम्पत्याने लग्नानंतर चार दिवसांतच 1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 7,54,88,000 रुपये मिळवले आहेत. लग्नानंतर आयुष्य, नशीब बदलतं असं म्हटलं जातं. पण आपलं नशीब अशा प्रकारे आणि एवढ्या लवकर बदलेल याचा विचारही या दाम्पत्याने केला नव्हता.
30 डॉलरमध्ये मिलियनेयर मेकर तिकीट खरेदी केलं
रिपोर्टनुसार, मायकल एबरनेथी यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं आहे. लग्नानंतर त्यांनी आपलं नशीब आजमवण्यासाठी लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या चार दिवसांनी ते लेक्सिंगटनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी 30 डॉलरमध्ये मिलियनेयर मेकर तिकीट खरेदी केलं. ज्यामुळे आता ते कोट्यधीश झाले आहेत. सध्या याच गोष्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
लॉटरीच्या पैशातून फ्लोरिडामध्ये हनीमूनला जाणार
"ज्या पद्धतीने हे सर्व घडलं ते अभूतपूर्व आहे. हा एक आशीर्वाद आहे. माझ्यासाठी हे लग्नाचं गिफ्टच आहे. आता लॉटरीच्या पैशातून पुढच्या वर्षी आपण फ्लोरिडामध्ये हनीमूनला जाणार आहोत. याच पैशातून तो आपला हनीमूनचा सर्व खर्च भागवणार आहे. तसंच मी 60 वर्षांचा असल्याने भविष्यासाठीही काही पैसे गुंतवणार आहे" असं मायकल एबरनेथी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.