शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

मॅन Vs वाईल्ड! मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:39 AM

जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेयर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनला होता.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतच्या मॅन Vs वाईल्ड या टेलिव्हीजन शो ने नवा विक्रम नोंदवला आहे. प्रसिद्ध सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर असलेल्या बेयर ग्रिल्सचा अंगावर शहारे आणणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कवरी चॅनेलवरचा मोदींसमवेतचा शो सर्वाधिक ट्रेंडींग शो ठरला आहे. याबाबत खुद्द बेयर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. मोदींसमवेतचा शो अधिकृतपणे जगातील सर्वाधिक ट्रेडिंग शो ठरला असून 3.6 बिलियन्स इम्प्रेशन या शोला मिळाल्याचं ग्रिल्सने सांगितलंय.  

जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेयर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनला होता. दरम्यान, बेयर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी दिसली होती. 12 ऑगस्ट रोजी हा शो टेलिकास्ट करण्यात आला होता. त्यावेळीही, खुद्द बेयर ग्रिल्स यानेच ट्विट करून माहिती दिली होती. त्यानंतर, आताही ग्रेल्सनेच ट्विटवरुन माहिती देताना, मोदींसमवेतचा शो सर्वात हीट शो ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा मोदींच्या लोकप्रियतेनं नवा उच्चांक गाठल्याचे दिसून येते.

मॅन Vs वाईल्ड या शोबद्दल बोलताना बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. 'घनदाट जंगलात, अत्यंत खडतर परिस्थितीतही मोदी सहजपणे फिरत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य थोडंही कमी झालं नाही' असं ग्रिल्सने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मोदींची कोणती गोष्ट तुमच्या कायम लक्षात राहील असा प्रश्न ग्रिल्सला विचारण्यात आला. त्यावर 'पावसातही मोदींच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम होते. ते खूप शांत आणि संयमी आहेत. संततधार पावसात जेव्हा सीक्रेट सर्व्हिसने त्यांच्यासाठी छत्री काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मी ठीक आहे असं म्हटलं आणि माझ्यासोबत ते नदीच्या दिशेने चालू लागले' असे ग्रिल्सने यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelevisionटेलिव्हिजनSocial Mediaसोशल मीडिया