माथेफिरुने 2 अल्पवयीन मुलींना 8व्या मजल्यावरुन खाली फेकले, कारण ऐकून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:08 IST2021-11-02T19:08:23+5:302021-11-02T19:08:34+5:30
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माथेफिरुने 2 अल्पवयीन मुलींना 8व्या मजल्यावरुन खाली फेकले, कारण ऐकून बसेल धक्का...
रशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने दोन अल्पवयीन बहिणींना 8व्या मजल्यावरून खाली फेकून दिले, यात त्या दोघींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माथेफिरुने सांगितलेले कारण तेवढेच धक्कादयक आहे. त्या व्यक्तीने सांगिल्यानुसार, मृत्यू झालेल्या दोघी बहिणी खेळताना खुप आरडाओरड करत होत्या, त्यामुळे दोघींना त्याने इमारतीवरुन फेकले.
आरोपी अटकेत
घटनेतील आरोपीचे नाव ओचूर संचित असे असून, तो फक्त 23 वर्षांचा आहे. रशियातील हॅलोविनच्या एका अपार्टमेंटमध्ये तो भाड्याने राहतो. याच अपार्टमेंटमधील एका घरातून 9 आणि 14 वर्षीय बहिणींचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्या ओरडण्याच्या आवाजाने संतापून आरोपीने दोघींना 8व्या मजल्यावरुन खाली फेकले. मुलींना फेकून दिल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आरोपी ओचूर संचेतला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने हत्येचे कारण सांगितले. हे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
घटनेवेळी आई घरात नव्हती
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मृत मुलींची आई रात्रीच्या शिफ्टमध्ये कॅफेमध्ये काम करत होती. घटनेच्या वेळी ती घरी नव्हती. शेजाऱ्यांनी तिला घटनेची माहिती दिली. 80 फूट खाली पडल्याने एका बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बहिणीचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपीला यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.