काय सांगता? 7 वर्षांपूर्वी बाईकने दिलेली धडक; तरुणाला आता मिळाले तब्बल 26 कोटी कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:35 IST2022-04-17T15:29:42+5:302022-04-17T15:35:58+5:30
Manuel Mathieu : सात वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातामुळे आता तरुणाला तब्बल 26 कोटी मिळाले आहेत. तरुणाला एका बाईकने धडक दिली होती.

फोटो - Manuel Mathieu
अपघाताच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. काही वेळा अपघातांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तर काही प्रकरणी अपघात करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते आणि जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार केले जातात. पण याच दरम्यान अपघाताची एक वेगळी घटना समोर आली असून सध्या त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातामुळे आता तरुणाला तब्बल 26 कोटी मिळाले आहेत. तरुणाला एका बाईकने धडक दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणात अपघातग्रस्त व्यक्तीला 26 कोटी रुपये मिळाले आहेत.
2015 मध्ये लंडनमध्ये ही घटना घडली होती. मॅन्युअल मॅथ्यू नावाच्या एका व्यक्तीचा अपघात झाला होता. हा व्यक्ती एक आर्टिस्ट आहे. रस्ता ओलांडताना एका बाईकने त्याला धडक दिली होती. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला जबरदस्त मार बसला होता. या प्रकरणी इंशोरन्स कंपनीकडून त्याला 26 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. खरं तर मॅन्युअलने कोर्टात इंशोरन्स कंपनीकडून तब्बल 248 कोटींची मागणी केली होती. त्यामुळे जवळपास सात वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होतं.
कोर्टाने अखेर दोन्ही पक्षाचे आरोप-प्रत्यारोप ऐकल्यानंतर 26 कोटी रुपये देण्यात यावे असे आदेश दिले आहेत. मॅन्युअल मॅथ्यू लंडनमधील गोल्ड स्मिथ कॉलेजमध्ये फाईन आर्टचं शिक्षण घेत होता. मात्र या अपघातामुळे त्याची सर्जनशीलता कमी झाली. त्याला आता पहिल्यासारखी चित्रं काढता येत नाहीत. जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याच्या डोक्यात प्रचंड वेदना जाणवतात. दोन वर्ष त्याला आपल्या पायांवर धड उभं देखील राहाता येत नव्हतं. या अपघातामुळे त्याचं करिअर खराब झालं असा दावाही त्याने कोर्टात केला होता.
सात वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होतं. ज्या बाईकमुळे त्याचा अपघात झाला. ती चोरीची बाईक होती. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही हा दावा देखील कोर्टात सिद्ध करण्यात आला. मॅथ्यूने तज्ज्ञ डॉक्टरांचे रिपोर्ट्स देखील कोर्टात सादर केले. यानंतर नुकसान भरपाई म्हणून त्याला 26 कोटी रुपये देण्यात यावे असे आदेश लंडनमधील न्यायालयाने दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.