आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:50 PM2021-10-24T19:50:08+5:302021-10-24T19:51:08+5:30

अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला पत्नीच्या रुपात बघायचे होतं.

man marries his girlfriend in ICU heart touching love story goes viral | आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर...

आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर...

Next

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या गर्लफ्रेंडचा कार अपघातात मृत्यू झाला. त्या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला लग्न करण्याचे वचन दिले होते. पण त्याआधी त्या मुलीचा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला पत्नीच्या रुपात बघायचे होतं.

‘द सन यूके’ च्या वृत्तानुसार, ३४ वर्षीय जिम व्यवस्थापक ग्रेग पीटर्स आणि २८ वर्षीय एण्णा लेडगर एकमेकांच्या खूप प्रेमात होते. दोघे फक्त १८ महिन्यांपूर्वी भेटले, परंतु एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. ते लग्नाचे प्लॅनिंग करत होते. दोघांच्या कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. पण एका अपघाताने सगळंच बदलून गेलं.

एक दिवस नोकरीवरून येत असताना एण्णा लेगरची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की एण्णांच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बॉयफ्रेंड ग्रेग पीटर्ससह कुटुंबही उपस्थित होते. प्रत्येकजण प्रार्थना करत होतं.

डॉक्टरांनी सांगितले की, एण्णाला आयसीयूमध्ये हलवावे लागेल, तिची प्रकृती खालावत होती. एण्णा कोमात गेली हे कळाल्यानंतर ग्रेग खूप अस्वस्थ झाला, त्याला एण्णांला गमवायचं नव्हतं. ग्रेगला तिला पत्नी म्हणून बघायचं होतं. जेणेकरून एण्णा पत्नीच्या रूपात त्यांच्या आठवणींमध्ये कैद राहिल.

ग्रेगने डॉक्टरांकडे विनवणी केली, पण त्यांनी नकार दिला. शेवटी, ग्रेगचे प्रेम आणि मनःस्थिती पाहून त्यांनी सहमती दिली. एण्णा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत, ग्रेगने आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी घालून तिला आपली पत्नी बनवलं. काही काळानंतर एण्णांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या संमतीने तिचे काही अवयव दान करण्यात आले. ज्यातून ६ लोकांना नवीन जीवन मिळाले.

Web Title: man marries his girlfriend in ICU heart touching love story goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app