गाडी चालवताना शारीरिक संबंध ठेवत होता ड्रायव्हर, अपघातात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:42 AM2021-06-19T10:42:05+5:302021-06-19T10:44:58+5:30

या अपघातात ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ट्रकमधील इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.  ट्रकने एका बारला टक्कर मारली होती.

Man charged killing a woman and two injured having oral sex while driving truck | गाडी चालवताना शारीरिक संबंध ठेवत होता ड्रायव्हर, अपघातात महिलेचा मृत्यू

गाडी चालवताना शारीरिक संबंध ठेवत होता ड्रायव्हर, अपघातात महिलेचा मृत्यू

Next

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सेन जोस शहरात एका ट्रक ड्रायव्हरवर एका महिलेची हत्या आणि दोन लोकांना गंभीर रूपाने जखमी करण्याचा आरोप आहे. सांगितलं जात आहे की, ड्रायव्हर चालत्या ट्रकमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता. ज्यानंतर हा अपघात झाला. यावेळी ड्रायव्हर नशेत असल्याचंही समोर आलं आहे.

या अपघातात ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ट्रकमधील इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.  ट्रकने एका बारला टक्कर मारली होती. ज्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, आरोपी ट्रक ड्रायव्हर एलिक्स मोरीनो विरोधात हत्या आणि नशेत ट्रक चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरूंगात टाकण्यात आलंय.

या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार नशेत ट्रक ड्रायव्हर आधी एका पबमध्ये वेश्येसोबत गेला होता. तिथे त्याला आत जाण्याची परवानगी दिली नाही. तेथून तो रागाने बाहेर आला आणि पार्किंगमध्ये गेला.

तो ट्रकमध्ये आणि काही वेळाने त्याने ट्रक रिटर्न घेतला. त्याने इतक्या वेगाने ट्रक मागे घेतला की, मागे असलेल्या लोकांना बाजूला होण्याचीही संध मिळाली नाही. आणि हा अपघात झाला. Los Angeles Times च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने दारूसोबतच ड्रग्सचंही सेवन केलं होतं. 

यादरम्यानच तो महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. महिला आणि ट्रक ड्रायव्हर इतका नशेत होता की, त्याला ट्रकच्या वेगाचा अंदाजही नव्हता. त्यामुळे हा अपघात झाला. ड्रायव्हरने आपल्या ट्रकने एका बारला टक्कर मारली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की, त्यांनी ट्रक ड्रायव्हरला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कुणाचं काही ऐकलं नाही. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man charged killing a woman and two injured having oral sex while driving truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app