मल्ल्या म्हणाला... मला कोणाची दया नको, सर्व पैसे चुकते करीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 05:30 IST2018-08-01T05:30:58+5:302018-08-01T05:30:58+5:30

भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले.

Mallya said ... I will not have mercy on anyone, I will pay all the money | मल्ल्या म्हणाला... मला कोणाची दया नको, सर्व पैसे चुकते करीन

मल्ल्या म्हणाला... मला कोणाची दया नको, सर्व पैसे चुकते करीन

लंडन : भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी मल्ल्याने आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असाही दावा केला.
भारतात परत पाठविल्यास आपल्याला आॅर्थर रोड कारागृहात ठेवण्याची योजना आहे. परंतु त्या तुरुंगातील स्थिती अमानवीय आहे, असा युक्तिवाद मल्ल्यातर्फे केला गेला. भारतातर्फे याचा इन्कार केला गेला. त्यावर आॅर्थर रोड कारागृहाच्या १२ क्रमांकाच्या बरॅकचा व्हिडीओ तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली गेली. तोपर्यंत मल्ल्याचा जामीनही वाढविण्यात आला. तसेच त्या दिवशी अंतिम युक्तिवाद ऐकले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Mallya said ... I will not have mercy on anyone, I will pay all the money