पायलटने आत्मघात करून मलेशियाचे विमान समुद्रात बुडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:43 AM2020-02-20T03:43:39+5:302020-02-20T03:44:13+5:30

टोनी अ‍ॅबॉट; आॅस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा दावा

Malaysian plane sank in a sea by pilot, tonny abbott | पायलटने आत्मघात करून मलेशियाचे विमान समुद्रात बुडविले

पायलटने आत्मघात करून मलेशियाचे विमान समुद्रात बुडविले

Next

सिडनी : कोलांलपूरहून ८ मार्च २०१४ रोजी बीजिंगला जाणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटने आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले, असा त्या देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कयास आहे, असा दावा आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी केला आहे.

या विमानात असलेल्या २३९ प्रवाशांमध्ये चीनच्या नागरिकांची बहुसंख्य होती. हे विमान हिंद महासागरात जिथे कोसळले असा संशय आहे, तेथील १,२०००० किमी परिसरात आॅस्ट्रेलियाच्या पथकाने समुद्राखाली विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला; पण हाती काहीच न लागल्याने अखेर जानेवारी २०१७ मध्ये ही शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर २०१८ साली अमेरिकेच्या एका खाजगी कंपनीने या विमानाच्या शोधासाठी समुद्रतळात मोहीम हाती घेतली; पण त्यांनाही काहीच सापडले नाही. त्यामुळे हे विमान बेपत्ता कसे झाले असावे याच्या अनेक कहाण्या, दंतकहाण्या गेल्या काही वर्षांत पसरल्या आहेत. पायलट झाहरी अहमद शाह यानेच आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले असावे, असा मलेशियाच्या काही वरिष्ठ अधिकाºयांचा कयास असल्याचे आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी सांगितल्याने खळबळ माजली आहे. मात्र अ‍ॅबॉट यांनी केलेला दावा झाहरीच्या कुटुंबियांनी फेटाळून लावला आहे. अ‍ॅबॉट यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी देणारा पुरावाच उपलब्ध नाही, असे मलेशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे माजी प्रमुख अझरुद्दीन अब्दुल रहमान यांनी म्हटले आहे.

तंत्रज्ञानाद्वारे मार्ग बदलला
बेपत्ता झालेल्या मलेशिया एअरलाईन्सचा मार्ग हवाई नियंत्रण कक्षातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्हे, तर माणसांच्या निर्देशानुसार बदलण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून झालेल्या चुकांमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीतून काढण्यात आला होता. या विमानातील मृत प्रवाशांमध्ये चार आॅस्ट्रेलियन नागरिकांचाही समावेश होता.

Web Title: Malaysian plane sank in a sea by pilot, tonny abbott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.