Helicopter crashes Video: प्रशिक्षण सुरू असताना पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. मलेशियात ही घटना घडली. १० जुलै रोजी बहुराष्ट्रीय सुरक्षा सराव सुरू असताना हेलिकॉप्टर सुंगाई नदीत कोसळले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर संयुक्त सुरक्षा सराव करत होते. एअरबस AS355N हे हेलिकॉप्टर जोहरमधील गिलांग पटाह येथे नदीपात्रात बुडाले.
वाचा >>मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत...
जेट्टीपासून विमान २१ दूर अंतरावर अपघातग्रस्त झाले. सकाळी १०.३७ वाजता हा अपघात झाला. तांजुग कुपांग पोलीस ठाण्यावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर ४६ मिनिटांनी हा अपघात झाला.
हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते?
सागरी पोलिसांनी सांगितले की, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर अपघातातील जखमींना तातडीने सुल्तान अमिना रुग्णालयात नेण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर तिघांची प्रकृती स्थिर आहे.
अपघाताचा व्हिडीओ
सराव सुरू असताना हेलिकॉप्टर अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि सुंगाई नदीपात्रात तोंडाच्या दिशेने बुडाले. पोलीस महानिरीक्षक मोहम्मद खालिद इस्माईल यांनी हेलिकॉप्टरमधील सर्वाची ओळख पटली असल्याची माहिती दिली.
हे हेलिकॉप्टर १९९६ चे आहे. पण, खालिद यांनी ते जुने असल्यामुळे हा अपघात झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्याचे व्यवस्थित मेटेंनन्स केले जात होते. दरम्यान, पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अपघाताचे व्हिडीओ पसरवू नये.