इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:40 IST2025-08-06T15:39:44+5:302025-08-06T15:40:24+5:30

इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या संघर्षानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडवून आणले आहेत.

Major political reshuffle in Iran; 'Supreme Leader' gives big responsibility to anti-radical leader | इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी

इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी

इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या संघर्षानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यांनी नुकतेच एका नवीन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला (National Defence Council) मंजुरी दिली असून, आता या परिषदेच्या प्रमुखपदी अली लारीजानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

६८ वर्षीय लारीजानी हे इराणच्या अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. खामेनी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित जनरल अली-अकबर अहमदियन यांच्या जागी लारीजानी यांना नियुक्त केले आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय इराणच्या सत्ताधारी पक्षाचा कट्टरपंथी दृष्टिकोन सोडून अधिक उदारमतवादी धोरणाकडे झुकण्याचा संकेत आहे.

कोण आहेत अली लारीजानी?
अली लारीजानी हे एका प्रभावशाली शिया मुस्लिम कुटुंबातून येतात. त्यांनी तत्त्वज्ञानात डॉक्टरेट केली आहे. ते इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे माजी सदस्य आहेत आणि गेल्या तीन दशकांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केले आहे. मे २०२० मध्ये खामेनी यांनी त्यांना आपले सल्लागार म्हणूनही नियुक्त केले होते.

राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
लारीजानी यांनी तीन वेळा इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. २००५ मध्ये ते सहाव्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर २०२१ आणि २०२४ च्या निवडणुकीतही त्यांना प्रमुख दावेदार मानले जात असतानाही त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्यात आले.

१९८१ ते १९९२ या काळात लारीजानी यांनी IRGC मध्ये महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यानंतर, २००५ पासून त्यांनी इराणच्या अणु धोरणाचे नेतृत्व केले. मात्र, दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर त्यांनी तत्कालीन अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिला. २००८ ते २०२० या काळात संसदेचे अध्यक्ष असताना त्यांनी जागतिक महासत्तांसोबत झालेल्या २०१५च्या अणु कराराला पाठिंबा दिला होता.

नवीन सुरक्षा परिषदेची भूमिका काय असेल?
इराणच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना युद्धसदृश परिस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी करण्यात आली आहे. या परिषदेचे नेतृत्व अध्यक्ष मसऊद पेजेश्कियान करतील. या परिषदेचा मुख्य उद्देश लष्करी धोरण ठरवणे आणि सैन्याची क्षमता वाढवणे आहे. परिषदेने घेतलेल्या निर्णयांना अंतिम मंजुरी सर्वोच्च नेते अली खामेनेई देतील. मात्र, या परिषदेचे सचिव म्हणून लारीजानी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, कारण त्यांनाच या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Major political reshuffle in Iran; 'Supreme Leader' gives big responsibility to anti-radical leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.