विमानाचा मोठा अपघात टळला! रस्त्यावरच इमर्जन्सी लँडिंग; डिव्हायडरवर आदळले अनेक गाड्यांना धडकले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:34 IST2026-02-10T18:33:25+5:302026-02-10T18:34:30+5:30
Gainesville plane crash: जॉर्जियात एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला. इंजिनमध्येच बिघाड झाल्याने पायलटला वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच उतरवण्यात आले.

विमानाचा मोठा अपघात टळला! रस्त्यावरच इमर्जन्सी लँडिंग; डिव्हायडरवर आदळले अनेक गाड्यांना धडकले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Plane crashes in Gainesville Video: अमेरिकेमधील जॉर्जिया राज्यात एका विमानाचा अपघात मोठा अपघात टळला. गैनेस्विल ली गिल्मर मेमोरियल एअरपोर्टवरून या विमानाने उड्डाण केले होते. ते कँटनमधील चेरोकी काऊंटी प्रादेशिक विमानतळावर उतरणार होते. पण, त्यापूर्वीच त्यात बिघाड झाला आणि विमानाचे लँडिंग करावे लागले.
एक इंजिन असलेले या विमानात हवेत असताना हवेत असताना बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती पायलटने अमेरिकेतील फेडरल एव्हिशन अॅडमिनिस्ट्रेशनला दिली. ९ जानेवारी रोजी ही घटना घडली.
🚨A single-engine plane reportedly made an emergency landing on a road in Gainesville, GA on Monday, according to police. Authorities say the plane hit several vehicles and minor injuries have been reported pic.twitter.com/PgCIeY3zut
— Aviation Reporter (@TripppleSeven7) February 9, 2026
गैनेस्वील पोलिसांनी सांगितले की, लहान विमान वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच अचानक उतरवण्यात आले. त्यामुळे अनेक वाहनांना ते धडकले. यात काही वाहनांचे नुकसान झाले असून, काही जण जखमीही झाले आहेत.
हॉकर बीचक्रॉफ्ट बीई ३६ विमानाच्या इंजिनमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.१० वाजता बिघाड झाला होता. या विमानाचे लँडिंग करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Live: #ChrisKing@FOX5Atlanta in Gainesville #Georgia. After a small plane lands onto Brown Bridge Rd closing the road. There were only minor injuries. He has an interview with the pilot and witnesses. #newspic.twitter.com/IoBT8L7YLN
— Jim Zorn (@PhotoZorn_TV) February 9, 2026
विमानामध्ये दोन पायलट होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विमान परत विमानतळापर्यंत नेण्यासाठी लागणारी शक्तीच निर्माण होत नसल्याचे त्यांना कळले.
A small plane made an emergency landing on busy Browns Bridge Rd & Pearl Nix Pkwy in Gainesville, Georgia, crashing into multiple vehicles near Golden Corral.
— GeoTechWar (@geotechwar) February 9, 2026
Minor injuries reported; intersection closed for investigation. #plane_crashpic.twitter.com/ZZmuZmU8Qb
त्यांनी लगेच रस्त्यावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. विमान लँड होण्याच्या काही सेंकद आधीच जमिनीवर आदळले आणि समोर रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकले. त्यानंतर इतर गाड्यांना विमान धडकले. यात काही लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने जखमी रुग्णालयात दाखल केले.