शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

मलेशियाच्या पंतप्रधानपदी ९२ वर्षांचे महाथिर महंमद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 11:29 AM

९२ वर्षांचे महाथिर पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत.

क्वालालंपूर- महाथिर महंमद यांना मलेशियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. ९२ वर्षांचे महाथिर पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले  सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ते ओळखले जातील. महाथिर यांनी २२२ पैकी ११३ जागांवर विजय मिळवला आहे. यापुर्वी त्यांनी २२ वर्षे मलेशियाची सत्ता सांभाळली होती. मात्र २००३ साली त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले होते.

मलेशियाचे मावळते पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. १ एमडीबी योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नजीब यांच्या बँरिसन नँशनल आघाडीला केवळ ७९ जागा मिळाल्या आहेत. ही आघाडी मलेशियात प्रदीर्घकाळ सत्तेत होती. महाथिर यांच्या विजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेल्या अन्वर इब्राहिम यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

सत्तेत पुन्हा येत असल्याचे स्पष्ट होताच महाथिर यांनी पत्रकार परिषद घेऊन, होय मी जिवंत आहे असे सांगत आपले नव्या सरकारबाबतचे मत मांडले. नजीब यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु, आपण सूड घेणार नाही मात्र कायद्याचे राज्य स्थापन होण्यासाठी प्रयत्न करु असेही ते म्हणाले. 

नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तसेच महाथिर यांच्यावर ते  एकाधिकारशाहीच्या विचारांचे आहेत असा आरोप होतो. निवडणूक निकालानंतर मलेशियाचे चलन रिंगिटचा भाव डाँलरच्या तुलनेत घसरला आहे.