शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News Live: दोन लाखांपर्यंत कर्जमाफी म्हणजे फक्त ‘सलाईन’; सरसकट कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 21:28 IST

Todays Breaking US-Israel Iran War Live News Updates in Marathi: महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...अमेरिका- इस्रायल ...

06 Mar, 26 09:28 PM

उल्हासनगर महापालिका थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी थेट ठेकेदाराची नियुक्ती, टार्गेट पूर्ण होईना?

उल्हासनगर  शहरातील थकीत मालमत्ता करधारकाकडील प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने मे. आद्यंता बीटूबी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली. वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी यांना खाजगी ठेकेदाराची मदत महापालिकेने घेणार असून याप्रकरणी महापालिका कारभारावर चौफर टिका होत आहे.

06 Mar, 26 07:41 PM

उद्धव सेनेच्या त्या तीन नगरसेवकांना पक्षाचा अंतिम इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत उद्धव सेनेकडून निवडून आलेल्या त्या तीन नगरसेवक कोणत्याही गटात सामील झालेले नसल्याने त्या नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांनी करावी. याबाबतचा खुलासा येत्या ४८ तासात संबंधित नगरसेवकांनी पक्षाकडे करावा अन्यथा त्यांचे पद रद्द करण्याची ही अंतिम नोटिस पक्षाकडूने देण्यात आल्याच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

06 Mar, 26 05:53 PM

दोन लाखांपर्यंत कर्जमाफी म्हणजे फक्त ‘सलाईन’; सरसकट कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची मागणी

राज्य सरकारने आज कर्जमाफीची घोषणा केली. परंतु या गोष्टीला आम्ही समाधानी नाहीये. मुळामध्ये विधानसभा होऊन दीड वर्ष झाले.दीड वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते. तीही शेतकरी आंदोलनाच्या  रेट्यामुळे ही कर्जमाफीची गोष्ट सरकारला करावी लागली. आणि दोन लाखापर्यंत कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला. किमान पाच लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे.आणि त्यामध्ये कुठले अटीशर्तीविना कर्ज माफी झाली पाहिजे अशी आमची मागणी. आणि इथून पुढे सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव, कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव. इतर शेती पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव जर दिला तर पुन्हा कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही. पण वारंवार जर सरकार सोयाबीन आणि कापसाच्या भावावर दरोडा टाकणार असेल तर पुन्हा पुन्हा कर्जमाफीची मागणी करावी लागेल. हे फक्त एक सलाई नाही याच्यातून शेतकरी खूप मोठा उभा राहिला असं नाही.. आणि रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना किमान एक लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान जाहीर करायला पाहिजे होत. अशी आमची मागणी आजच्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये आम्ही पूर्णपणे समाजाने नाही. - रविकांत तुपकर,शेतकरी नेते.

06 Mar, 26 05:52 PM

अकोल्यात गाव संघर्ष समितीचे आंदोलन; रस्त्याच्या कामासाठी 26 मार्चची मुदत....!

अकोला जिल्ह्यातील हातरुण, लोणाग्रा, कंचनपूर, बदलापूर, मांजरी, अमानतपूर, ताकोडा, खडकी, भोळ, सांगवी आणि मोहाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा निधी मंजूर असूनही काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गाव संघर्ष समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तर “आता नाही तर कधीच नाही” असा नारा देत मोठ्या संख्येने गावकरी या आंदोलनात सहभागी झाले होते आणि रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 26 मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. 

06 Mar, 26 05:52 PM

नांदेड शहरात १३ ते १८ मार्च दरम्यान मिनी सरस विक्री प्रदर्शन

नांदेड शहरात १३ ते १८ मार्च दरम्यान मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनात बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नांदेड शहरातील विविध ठिकाणी बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या हस्तकला, घरगुती व उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या विक्री प्रदर्शनाद्वारे महिलांना त्यांच्या उत्पादनांची ओळख आणि आर्थिक मदत मिळेल.मीनल करणवाल जिल्हा परिषद, नांदेड यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद द्यावा आणि स्थानिक महिला उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे.

06 Mar, 26 05:51 PM

पिराचीवाडीत भाऊ कदमांची बैलगाडीतून मिरवणूक; जिल्हा परिषद सीईओंचं ‘चॅलेंज’

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिराचीवाडी या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या निमित्ताने आज अभिनेते भाऊ कदम यांनी पिराचीवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विविध निधी तसेच लोकसहभागातून गावात करण्यात आलेल्या विकासकामांचे उद्घाटनही आज भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस देखील उपस्थित होते. पिराचीवाडी ग्रामस्थांनी बैलगाडीतून काढलेल्या मिरवणुकीमुळे आणि केलेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे भाऊ कदम देखील भारावून गेले.

06 Mar, 26 05:51 PM

नरडाण्यात व्यापाऱ्यावर हल्ला; निषेधार्थ दुकाने बंद ठेवत रास्ता रोको

धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे गावातील व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन केले. काल सायंकाळी दोन तरुणांनी एका मेडिकल दुकानासमोर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मेडिकल दुकानाच्या चालकाने त्यांना हटकले असता त्या दोघांना राग अनावर झाला. त्यांनी मेडिकल दुकान मालकाला बेदम मारहाण करत दुकानातील पैसे घेऊन पसार झाले. या घटनेच्या निषेधार्थ आज नरडाणे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच रस्त्यावर उतरून निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले.
 

06 Mar, 26 05:50 PM

खासदार काळेंची राज्य सरकारवर टीका; “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला”

जालना खासदार कल्याण काळे यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भरीव तरतूद करण्याची मागणी केली. खासदार काळे म्हणाले की, महापुरुषांच्या नावाने योजना जाहीर करताना उदारतेने निर्णय घ्यावा, पण सरकारने तसे केले नाही. खासदार काळेंनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत पुरेसा भरीव निधी ठेवला नाही. “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला” अशी टीका त्यांनी केली, म्हणजे महापुरुषांच्या नावाने योजना जाहीर करताना अधिक उदार निर्णय घ्यावा असे अपेक्षित होते. त्यांनी सरकारला सुचवले की, शेतकऱ्यांच्या आर्थिक भारासाठी भरीव तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.

06 Mar, 26 05:49 PM

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी रंजिता चाकोते बिनविरोध

-1300 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या आता एका महिलेच्या हाती.

-सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड.

-स्थायी समिती सभापतीपदासाठी रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

-सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी त्यांचा सत्कार केला.

-सोलापूर शहरातील मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही चाकोते यांनी दिली.

-महानगरपालिकेतील 102 नगरसेवकांना समान निधी देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

-रंजिता चाकोते यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

06 Mar, 26 05:49 PM

धर्मांतर विरोधी विधेयकाबाबत जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींचे समर्थन

रत्नागिरीत धर्मांतर विरोधी कायद्याबाबत येणाऱ्या विधेयकावर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आपले मत मांडले. त्यांनी विधेयकाचा स्वागत करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे अभिनंदन केले. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले की, बाहेरून येणाऱ्या पैशांच्या माध्यमातून धर्मांतर होऊ नये यासाठी या कायद्यात योग्य तरतूद असावी. धर्मांतर झाल्यास ते गुन्हा ठरवले पाहिजे, विशेषतः हिंदू महिलांनी दुसऱ्या धर्मात विवाह केल्यास तिच्या धर्म बदलण्यावर बंदी असावी. त्यांनी सांगितले की, या महिलेला होणाऱ्या मुलावर आईचा धर्म लागू व्हावा आणि या गोष्टी कायद्यात स्पष्ट कराव्यात. तसेच लव जिहादला आळा बसावा यासाठी कठोर कलम असावे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मते, जे हिंदू धर्माचे मूळ सदस्य आहेत, त्यांचा धर्म न बदलता उपासना पद्धत बदलली तरी तो धर्मांतर मानले जाणार नाही. जर हिंदू धर्मात परत आले तर त्यांची घर वापसी होईल, आणि धर्मगुरू म्हणून हिंदू धर्मात प्रवेश करून घेतल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ नये.

06 Mar, 26 05:48 PM

धर्मांतरणविरोधी कायद्याला मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनिल बोंडे यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कॅबिनेटमध्ये धर्मांतरण विरोधी कायद्याचं विधे पारित केलेले आहे आणि या कायद्यामुळे बळजबरीने धर्मांतरण करेल फसवणूक करून करेल लव्ह जिहाद च्या माध्यमातून करेल अशा सर्वं व्याप्तीना दहा वर्षापर्यंत जे सत्त मजुरी शिक्षा आणि दंड या दोन्ही गोष्टी दिले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन केले आणि या साठी सरकार पाहिजे होती.  कारण काँग्रेसची मुसलमानांची रांगोळ चरण करण्याची पद्धत एवढी होती. काँग्रेस जर राहिली असती तर कदाचित त्यांचे पुराम पूर्ण भारताला हिरवा करण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं कारण की काँग्रेस संपूर्णतः हिंदू विरोधी परंतु आज या धर्मांतरणाची लाट येत होती, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोन्डे यांची यांनी दिली.

06 Mar, 26 05:47 PM

खेड लोटे औद्योगिक वसाहतीत स्फोट; ९ कामगार जखमी

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीमध्ये आज दुपारी २:१५ वाजता स्फोट झाला. या घटनेत ९ कामगार जखमी झाले असून घटनास्थळी पोलीस आणि मंडल अधिकारी उपस्थित राहिले. आज दुपारी २:१५ वाजता लोटे औद्योगिक वसाहतीत डॉ. खान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ९ कामगार जखमी झाले आहेत. घटनास्थळी खेड पोलीस निरीक्षक आणि मंडल अधिकारी एडगे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

06 Mar, 26 05:47 PM

मोठ्या घोषणा, निधीचा अभाव; अर्थसंकल्पावर विरोधकांचा हल्लाबोल

निव्वळ आकड्यांची फेकाफेकी करणारा हा अर्थसंकल्प असून केंद्रातील सरकार प्रमाणे राज्य सरकार देखील २०४७ चे गाजर दाखवते.  मोठमोठ्या निधीच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या जातात पण प्रत्यक्षात पुरेसा निधी दिला जात नाही असा आजपर्यंतचा महायुती सरकारचा कारभार आहे. यावेळचे बजेट देखील असेच मोठमोठे दावे करणारे आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री विदर्भातील असून देखील विदर्भाच्या सिंचनासाठी ठोस तरतुदी या बजेटमध्ये नाहीत. लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० करण्याचे आश्वासन दिले होते मात्र याही वर्षी लाडकी बहिण योजनेची रक्कम २१०० न करून सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मोठमोठ्या घोषणा आहेत अर्थसंकल्पात, शेतकऱ्यांचे उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढवणार म्हणते सरकार मग गतवर्षात कृषी विकास दर ३.४ टक्क्यांपर्यंत कसा घसरला यांचे उत्तर सरकार का देत नाही. कृषी उत्पन्न ५५ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलर करण्याची घोषणा निव्वळ धूळफेक आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी म्हंटले होते,  मग फक्त २ लाखापर्यंतचे पीक कर्जमाफी असा निर्णय का? अशी विचारणा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली.

06 Mar, 26 04:22 PM

कोकणातील आंबा-काजू बागायतदाराचे नुकसान, उद्धव सेनेची भरपाईची मागणी

कोकणात आंबा उत्पादक शेततरी पूर्णपणे बेजार झाला आहे. दोनवेळा मोहोर आला तोही गळून गेला. शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाले आहे. काजू आणि आंबा उत्पादकांना सरसकट हेकटरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिले पाहिजे. ह्यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदयांनी आदेश द्यावे, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली.

06 Mar, 26 02:41 PM

गावातील रस्ते काँक्रिटचे बनवणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

राज्यातील १ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांना काँक्रिट रस्त्याने जोडण्याची घोषणा, या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने ४५०० कोटी रूपयांचा कार्यक्रम राबवण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06 Mar, 26 02:36 PM

नाशिक महापालिकेत पाण्यावरून आंदोलन; प्रियांका माने हंडा घेऊन सभागृहात

नाशिक महापालिकेत पाण्यावरून आंदोलन; प्रियांका माने हंडा घेऊन सभागृहात. भाजपच्या नगरसेविका प्रियांका माने यांचे आंदोलन.पाण्याचा हंडा घेऊन प्रियांका माने सभागृहात पोहोचल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात पाणी नसल्याने प्रियांका माने आक्रमक झाल्या आहेत.
 

06 Mar, 26 02:31 PM

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूयारी मार्ग उभारणार

रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई, पुण्यात भूयारी मार्ग उभारले जाईल. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी छेडा नगर ते साकेत नगर उन्नत मार्ग तयार केला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06 Mar, 26 02:24 PM

२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटींवर नेणार

२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटीपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. मुंबई, दुबई, सिंगापूर येथे पर्यटन गुंतवणूक कक्ष उभारले जातील.  निवडक ५० पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी दिला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 

06 Mar, 26 02:14 PM

धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार; कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील २०१७ सालच्या खून प्रकरणातील आरोपी भिकन पिंजारी हा धुळे कारागृहातून पसार झाला आहे. तो धुळे येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता. शेतीच्या कामासाठी तो नियमितपणे कारागृह परिसरात जात होता.

06 Mar, 26 02:11 PM

भारताविरोधात कुरापती करणाऱ्या 'त्रिकुटा'चं संकट वाढलं

इराणशी युद्धात तुर्की आणि अझरबैजान यांनाही फटका बसला आहे. याचा परिणाम आशियाई देश पाकिस्तानवरही पडला आहे. भारताच्या नजरेने मध्य पूर्वेतील युद्धामुळे तुर्की, अझरबैजान आणि पाकिस्तान या तिन्ही कुरापती करणाऱ्या देशांना हैराण केले आहे. मागील काही वर्षापासून हे तिन्ही देश स्वत:ला एक रणनीती भागीदार म्हणून दाखवतात. संरक्षण करार, सैन्य सराव आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही या तिघांनी बरीच चर्चा असते. परंतु मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे या तिन्ही देशांवर परिणाम केला आहे. (वाचा सविस्तर)

06 Mar, 26 02:08 PM

अजित पवारांचे भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद राहिलेले आणि दीर्घकाळ अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा आज हयात नाहीत. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आहे. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही प्रेरणा देत आहे. अजितदादांच्या व्यक्तिमत्वास साजेसे असे भव्य स्मारक आणि गतीमान नागरी सेवा पुरस्कार अजितदादांच्या नावे देण्याचे जाहीर करतो. 
 

06 Mar, 26 11:30 AM

नाशिक: आखाती देशांतील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम; निर्यात घटल्याने भाव घसरले

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता भारतीय कृषी बाजारावरही दिसू लागला आहे. विशेषतः कांदा निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून बाजारात कांद्याचे सरासरी भाव हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील नाशिक परिसरातून मोठ्या प्रमाणात कांदा आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. मात्र सध्या त्या भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वाहतूक आणि व्यापार व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

06 Mar, 26 11:27 AM

"महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेणारा अर्थसंकल्प असेल"

अर्थसंकल्पाची वाट पाहा, दुपारी २ वाजता विधानसभेत जनतेसमोर अर्थसंकल्प सादर केला जाईल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आमची कटिबद्धता दिसून येईल - अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल

06 Mar, 26 10:27 AM

यवतमाळ जिल्ह्यासाठी 15.14 कोटींचा पाणीटंचाई आराखडा; 877 गावांत 1040 उपाययोजना प्रस्तावित

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 15 कोटी 14 लाख 61 हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील 877 गावांसाठी 1040 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनची अनेक कामे अपूर्ण असल्यामुळे मार्च ते मे दरम्यान पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन खाजगी विहिरींचे अधिग्रहण, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, विंधन विहिरी आणि नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

06 Mar, 26 10:21 AM

व्यावसायिक सिलेंडर्सच्या ऑर्डर घेऊ नका, HPCL, BPCL च्या डिलर्सना सूचना

इराण इस्रायल युद्धामुळे आखाती देशात तणावाची स्थिती आहे. या युद्धाची झळ आता भारताला बसू लागली आहे. व्यावसायिक सिलेंडरसाठी नव्याने ऑर्डर घेऊ नका अशा सूचना एचपीसीएल, बीपीसीएलने डिलर्सना केली आहे. ५, १९, ३५, ४७ आणि २८४ किलो सिलेंडर्सच्या ऑर्डर रोखल्या. पुणे जिल्ह्यातील चाकण, शिक्रापूर येथील डिलर्सना सूचना मिळाली. 

06 Mar, 26 10:01 AM

सुखोई-३० दुर्घटनेत देशाने गमावले दोन तरुण फायटर पायलट्स!

आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सुखोई-३० एमकेआय फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरागकर अशी या वीरपुत्रांची नावे आहेत. वायुसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला असून, दोन्ही शूरवीरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

06 Mar, 26 10:01 AM

जालना : पाणी शुद्धीकरण प्लांटला मध्यरात्री भीषण आग ;मोठे नुकसान

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हेलसवाडी येथे आरओ पाणी शुद्धीकरण प्लांटला मध्यरात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. मंठा तालुक्यातील हेलसवाडी गावात असलेल्या आरओ पाणी शुद्धीकरण प्लांटला मध्यरात्री अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की प्लांटमधील पाण्याच्या टाक्या, फिल्टर यंत्रणा, पाईपलाईन, मोटार तसेच प्लांटवरील पत्रे पूर्णपणे जळून खाक झाले.

06 Mar, 26 09:48 AM

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे राज्यसभेवर बिनविरोध; सोलापुरात मोची समाजाचा आनंदोत्सव

मोची समाजाच्या कन्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापुरात मोची समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.

06 Mar, 26 09:01 AM

UAE च्या प्रसिद्ध उद्योगपतीचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले पत्र

UAE च्या टॉप उद्योगपतींपैकी एक अब्जाधीश खलफ अहमद अल हब्तूर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी खुले पत्र लिहून इराणसोबत युद्ध करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. इराणसोबतच्या युद्धात आमच्या प्रदेशाला ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा धोकादायक निर्णय कोणत्या आधारावर घेतला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. 

06 Mar, 26 09:01 AM

UAE च्या प्रसिद्ध उद्योगपतीचे डोनाल्ड

UAE च्या टॉप उद्योगपतींपैकी एक अब्जाधीश खलफ अहमद अल हब्तूर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी खुले पत्र लिहून इराणसोबत युद्ध करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. इराणसोबतच्या युद्धात आमच्या प्रदेशाला ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा धोकादायक निर्णय कोणत्या आधारावर घेतला? असा थे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. 

06 Mar, 26 08:54 AM

शिवज्योत आणताना काळाने गाठलं; मावळमध्ये भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

शिवजयंतीच्या दिवशी मावळ तालुक्यातील शिवभक्तांवर दुर्दैवी काळाने घाला घातला. शिवज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्यू झालेल्या शिवभक्तांची नावे आहेत. हे दोघेही मावळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी होते.

06 Mar, 26 08:41 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; कोणता देश अमेरिकेचं पुढचं टार्गेट?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात आणखी एक मोठं विधान केले आहे. सध्या इराणशी सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने अमेरिकेचे प्राधान्य आहे. हे युद्ध संपल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष क्बूयावर असू शकते असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.  (वाचा संपूर्ण बातमी)

06 Mar, 26 08:39 AM

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित

मुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि. ६) राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडतील. यात आर्थिक शिस्त दिसेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. 
(वाचा सविस्तर)

06 Mar, 26 08:36 AM

इस्रायलचा बेरूतमध्ये भीषण एअर स्ट्राईक

आखतात सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. इस्रायली हवाई दलाने गुरुवारी लेबनॉनची राजधानी बेरूतवर जबरदस्त एअर स्ट्राईक करत हिजबुल्लाहचा बडा कमांडर झैद अली जुमा याला कंठस्नान घातले. या कारवाईमुळे हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला असून संपूर्ण लेबनॉनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (सविस्तर वाचा)

टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026T20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६