पाकिस्तानच्या लाहोरमधील लव मंदिराचा जीर्णोद्धार; जनतेला दर्शनासाठी केले खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:49 IST2026-01-28T07:48:59+5:302026-01-28T07:49:55+5:30

Love Temple In Lahore: पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ऐतिहासिक लाहोर किल्ल्यात असलेले प्रभू श्रीरामांच्या दोन पुत्रांपैकी लव (लोह मंदिर) यांचे मंदिर पूर्ण जीर्णोद्धारानंतर जनतेसाठी उघडण्यात आले आहे. या मंदिरावरूनच शहराला लाहोर हे नाव पडल्याची हिंदूंची मान्यता आहे.

Love Temple in Lahore, Pakistan, restored; opened for public viewing | पाकिस्तानच्या लाहोरमधील लव मंदिराचा जीर्णोद्धार; जनतेला दर्शनासाठी केले खुले

पाकिस्तानच्या लाहोरमधील लव मंदिराचा जीर्णोद्धार; जनतेला दर्शनासाठी केले खुले

लाहोर - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ऐतिहासिक लाहोर किल्ल्यात असलेले प्रभू श्रीरामांच्या दोन पुत्रांपैकी लव (लोह मंदिर) यांचे मंदिर पूर्ण जीर्णोद्धारानंतर जनतेसाठी उघडण्यात आले आहे. या मंदिरावरूनच शहराला लाहोर हे नाव पडल्याची हिंदूंची मान्यता आहे.

लाहोर प्राधिकरणाने ही माहिती देताना मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झाली असल्याचे स्पष्ट करून या मंदिरासोबत शीख काळातील हम्माम आणि महाराजा रणजितसिंग यांचे आठदारा सभागृह या  पुरातन वास्तूंचाही जीर्णोद्धार केला असल्याचे सांगितले. 

असे आहे लव मंदिर
लव (लोह) मंदिर हे लाहोर किल्ल्याच्या संकुलातील परस्परांशी जोडलेल्या खोल्यांचा एक समूह आहे. मध्यभागी छत नसलेली ही वास्तू  आहे. २०१८ मध्ये मंदिराचा काही प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आला होता.

हा आहे उद्देश
शीख आणि हिंदू मंदिरांच्या तसेच ब्रिटिश काळातील मुघल सत्तेसंबंधीच्या वास्तूंच्या रूपाने लाहोर किल्ल्याचे वैभव व सांस्कृतिक वारसा जतन करणे हा या वास्तूंच्या जीर्णोद्धारामागील उद्देश असल्याचे ‘वॉल्ड सिटी ऑफ लाहोर ॲथॉरिटी’ने म्हटले आहे.

१०० स्मारकांची ओळख
गेल्या वर्षी अमेरिकास्थित डॉ. तरुणजितसिंग बुटालिया या संशोधकाने लाहोर किल्ला परिसरातील सुमारे १०० स्मारके प्रकाशझोतात आणली होती.

Web Title : लाहौर में लव मंदिर का जीर्णोद्धार, जनता के लिए खोला गया: सांस्कृतिक पुनरुत्थान

Web Summary : लाहौर का ऐतिहासिक लव मंदिर, भगवान राम के पुत्र के नाम पर, बहाल कर जनता के लिए खोल दिया गया है। लाहौर प्राधिकरण ने संरक्षण कार्य पूरा किया, किले के भीतर सिख-युग की संरचनाओं को भी बहाल किया। इसका उद्देश्य लाहौर किले की सांस्कृतिक विरासत को संरक्षित करना है, पिछले साल 100 से अधिक स्मारकों की पहचान की गई।

Web Title : Lahore's Lav Temple Restored, Opens to Public: A Cultural Revival

Web Summary : Lahore's historic Lav Temple, named after Lord Rama's son, has been restored and opened to the public. The Lahore Authority completed conservation work, also restoring Sikh-era structures within the fort. This aims to preserve Lahore Fort's cultural heritage, with over 100 monuments identified last year.