भारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र - ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 04:50 IST2018-09-25T04:49:50+5:302018-09-25T04:50:03+5:30

मला भारताविषयी आत्मीयता आहे. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा द्या असा खास निरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोमवारी दिला.

 Love me about India; Modi is my friend - Trump | भारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र - ट्रम्प

भारताविषयी मला प्रेम; मोदी माझे मित्र - ट्रम्प

संयुक्त राष्ट्रे : मला भारताविषयी आत्मीयता आहे. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा द्या असा खास निरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोमवारी दिला.
संयुक्त राष्ट्रांत अमली पदार्थ विरोधातील एका कार्यक्रमप्रसंगी ट्रम्प व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यावर संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत निकी हॅले यांनी ट्रम्प यांची सुषमा स्वराज यांच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या वतीने स्वराज यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर ट्रम्प यांनी मोदी हे माझे मित्र असून त्यांनाही माझ्या शुभेच्छा द्या असे सांगितले. संयुक्त राष्ट्रांची ७३ वी आमसभा सोमवारपासून सुरू झाली. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title:  Love me about India; Modi is my friend - Trump