Relationship : खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी प्रत्येक देशात ‘डेटिंग’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 06:57 IST2023-04-22T06:56:26+5:302023-04-22T06:57:03+5:30

Relationship : एका तरुणीने जीवनसाथी शोधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे.

Love: 'Dating' in every country to find true love! | Relationship : खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी प्रत्येक देशात ‘डेटिंग’!

Relationship : खऱ्या प्रेमाच्या शोधासाठी प्रत्येक देशात ‘डेटिंग’!

एका तरुणीने जीवनसाथी शोधण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर आणि व्यवसायाने क्रिप्टोकरन्सी ट्रेडर असलेली स्टार्ली सेंटोस (२७) जगाच्या जवळपास प्रत्येक देशात योग्य जोडीदार शोधण्यासाठी जात असून वेगवेगळ्या संस्कृतीतील तरुणांसोबत ‘डेटिंग’ करत आहे. शिवाय, प्रत्येक ‘डेट’चे ती व्हिडिओही बनवते आणि सोशल मीडियावर शेअर करते. कोलंबियामध्ये ती एकासोबत ‘कॉफी डेट’वर गेली होती. तर थायलंडमध्ये ‘स्ट्रीट फूड’च्या डेटवर होती. ती भारतातही आली होती आणि मुंबईत यॉट सफर केली, बालीमध्ये सर्फिंगही केले. विविध देशांच्या तरुणांशी ती चर्चा करते, फिरते, संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण, जोडीदार म्हणून कोणाचीही निवड करायची नाही, अजूनही ‘मिस्टर राईट’ शोधण्याचे ‘मिशन’ सुरू आहे, असे ती म्हणाली. व्हिसा न मिळाल्याने काही देशांना यादीतून काढून टाकले तर काही ठिकाणी विचित्र चालीरीती आणि सुरक्षेमुळे जाणार नाही, असेही ती सांगते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओंची चर्चा आहे.

Web Title: Love: 'Dating' in every country to find true love!