शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

एकाकीपणामुळे जीवन कंटाळवाणे झाले, वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच विक्रीला काढले

By बाळकृष्ण परब | Updated: October 1, 2020 16:11 IST

young man sells himself facebook : कोरोनाकाळात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान दहा वर्षांपासून एकाकी असलेल्या एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देदहा वर्षात एकाही रिलेशनमध्ये राहू न शकल्याने या तरुणाचे जीवन एकाकीपणामुळे कंटाळवाणे बनले होतेआपल्या जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतलाअ‍ॅलन क्लेटॉन असे या स्वत:लाच विक्रीला काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे

लंडन - कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनेक जोडप्यांना फटका बसला होता. वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्याने अनेकांना दुरावा सहन करावा लागला होता. दरम्यान, या काळात काही जोडप्यांना मात्र दीर्घकाळ एकत्र राहता आले. काही ठिकाणी बराच वेळ एकत्र राहिल्याने वादविवाद होऊन घटस्फोटाच्या घटनांमध्येही वाढ दिसून आली. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगमुळे अनेकांचे जीवन कंटाळवाणे बनले. पण याच दरम्यान एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा लॉकडाऊन, कोरोनाशी काहीही संबंध नाही आहे.तर हा ३० वर्षीय तरुण गेल्या १० वर्षांपासून एकाकी जीवन जगत आहे. दहा वर्षात एकाही रिलेशनमध्ये राहू न शकल्याने या तरुणाचे जीवन एकाकीपणामुळे कंटाळवाणे बनले होते. त्यामुळे आपल्या जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वत:चा फेसबूकवर सेलसुद्धा लावला. सर्वात गमतीदार बाब म्हणजे या तरुणाने या सेलमध्ये स्वत:ची किंमत आणि अटीशर्तींचासुद्धा उल्लेख केला आहे. आता या तरुणाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली असून, लोकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. मात्र या पोस्टमुळे आपल्या जीवनात पुन्हा चैतन्य येईल असा या तरुणाला विश्वास आहे.एकाकीपणाला वैतागलेला हा तरुण ऑनलाइन प्रेमाच्या शोधात आहे. दरम्यान, स्वत:चा सेल लावल्यानंतर त्याच्याकडे मुलींच्या ऑफर्सची रांग लागली आहे. आता आपल्या जीवनातील एकाकीपणा संपुष्टात येईल, अशी त्याला आशा आहे. अ‍ॅलन क्लेटॉन असे या स्वत:लाच विक्रीला काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या १० वर्षांपासून एकाकी आहे. त्याने अनेक डेटिंग अ‍ॅप वापरले मात्र त्याला कुणी पार्टनर मिळाली नाही. त्यानंतर त्याने स्वत:लाच विक्रीला लावण्याचा निर्णय घेतला. यूकेचा रहिवासी असलेला अ‍ॅलन पेशाने लॉरी ड्रायव्हर आहे. त्याने स्वत:चा फ्री आणि वापरण्यासाठी चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचा उल्लेख केला आहे.आपल्या जाहिरातीमध्ये अ‍ॅलन म्हणतो की, महिलांनो मी अ‍ॅलन ३० वर्षांचा आहे. मी एका प्रेमळ महिलेच्या शोधात आहे. जिच्यासोबत मी बोलू शकेन आणि जिच्यासोबत मी काही सोहळ्यांमध्ये जाऊ शकेन. तिथे मी एकटा जाऊ इच्छित नाही.

दरम्यान, स्वत:च्या विक्रीची जाहिरात दिल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याच्या पोस्टवर अनेक मुलींनी त्याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे. अ‍ॅलनच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत यापैकी एका मुलीसोबत तो बाहेर जाऊन आला आहे. आता इतर मुलींसोबत डेटवर जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया