शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा

By admin | Published: June 23, 2017 4:25 PM

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला

केदार लेले / ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला. यात "महाराष्ट्र मंडळ लंडन" च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे विशेष आभार मानण्यात आले.
 
महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त, लंडन मराठी संमेलन २०१७ आजोजित करण्यात आले होते. लंडन मराठी संमेलन (एलएमएस २०१७) ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली ज्याच्यात १५० होऊन अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते.
 
शुक्रवारी (दि. 2 जून रोजी), १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, येथे "एलएमएस"ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली. उद्योजक सोहळ्याचे आयोजन दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी प्रशस्थ अशा १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, लंडन येथे घडवून आणले.
 
जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आणि पुरस्कार 
या परिषदेत जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यात खालील उद्योजकांना पारितोषिके देण्यात आली:
एस्टॅब्लिश श्रेणी - गोल्ड पारितोषिक विजेते: श्री उमेश दाशरथी, सिल्वर: श्री संजीव नाबर, ब्रॉन्झ: श्रीकृष्ण गांगुर्डे, श्री अमरेंद्र कुलकर्णी आणि स्टार्ट-उप श्रेणीमध्ये - गोल्ड: श्री रोहन आणि श्री प्रियल नागरे, सिल्वर: विलास शिंदे, ब्रॉन्झ: श्री प्रसाद भिडे. ह्या स्पर्धेत १०० होऊन अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता आणि जजींग पॅनल वर होते: श्री शंतनू भडकमकर, श्रीराम दांडेकर, श्री चंद्रशेखर वझे, डॉ नितीन देसाई आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई.
 
तसेच खालील व्यक्तींचा त्यांनी केलेल्या अभूतपूर्व समाजसेवेबद्दल, आणि त्यांच्या क्षेत्रात दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल सन्मान केला गेला
रांका ज्वेलर्स चे श्री फतेहचंद रांका यांना "एक्सलेन्स अचिव्हमेंट इन बिझनेस आणि सोशल पुरस्कार"
PNG ज्वेलर्स चे श्री सौरभ गाडगीळ यांना "महाराष्ट्रीयन यूथ आंतरप्रेन्युर आयकॉन पुरस्कार"
बडवे इंजिनीरिंग लिमिटेड चे श्री श्रीकांत बडवे यांना "ऑटोमोटिव्ह इंजिनीरिंग एक्सलेन्स पुरस्कार "
R.K"s होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सी चे श्री राजेश खानविलकर यांना "रियल इस्टेट जगतातील स्पेशल इनोवेटिव्ह पुरस्कार"
 
ह्या स्पर्धेचे समन्वय केले होते सौ श्वेता गानू ह्यांनी. त्यानंतर थेम्सवर क्रूझचे आयोजन करण्यात आले होते.
 
थेम्स वरची सर्वात मोट्ठी क्रूझ - डिक्सी क्वीन
पहिल्यांदाच सर्व क्रूझ ही एलएमएस २०१७ च्या उपस्थितांसाठी आयोजित होती ज्यात २०० होऊन अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. तसेच थेम्सवरील क्रूझच्या मार्गक्रमण होताना ऐतिहासिक टॉवर ब्रिज दोनदा उघडण्यात आला. चार तासांच्या ह्या क्रूझ वर जेवण आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
लंडन मराठी संमेलन २०१७ – विविध सांस्कृतीक कार्यक्रम 
सांस्कृतीक कार्यक्रमांची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडन ढोल बिट्स UK च्या चमूने ढोलताशा च्या गजरात केली ज्याच्यात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोमोडोर डेविड एलफोर्ड हे होते.
रागसुधा विंजामुरी यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर सारंग कुसरे लिखित लंडन मराठी संमेलन थिम पोवाडा योगेश जोशी आणि ग्रुप यांनी गायला. कवी: सारंग कुसरे, संगीतकार  व संयोजन: योगेश जोशी.  गायक: योगेश जोशी, सुधांशु पटवर्धन, सौरभ वळसंकर, सौरभ सोनावणे, सारंग कुसरे, सारिका टेम्बे-जोशी, गायत्री सोनावणे, देवीना देवळीकर, दिया जोशी आणि कबीर पटवर्धन.  
कोमोडोर डेविड एलफोर्ड यांनी मुख्य अतिथी म्हणून बोलाविले बद्दल आभार व्यक्त केले आणि ब्रिटिश नेव्ही चा केवळ संरक्षणच नव्हे परंतु सामाजिक बांधिलकी आणि सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे असे सांगितले. 
 भारतीय विकास ग्रुप चे श्री हणमंतराव गायकवाड यांनी एकीचे बळ आणि परदेशस्थ भारतीयांना भारतात कशी मदत करता येईल याच्यावर प्रेक्षकांना योग्य सूचना दिल्या. त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल आणि अभूतपूर्व भाषणाबद्दल त्यांना लोकांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला.
श्री सौरभ गाडगीळ यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले आणि PNG हे १८३२ साली सुरुवात झाली आणि महाराष्ट्र मंडळ लंडन याची १९३२ साले स्थापन झाल्याची लोकांना आठवण करून दिली.
श्री राजेश खानविलकर यांनी रिअल इस्टेट मध्ये घेण्यात येणाऱ्या २% कमिशन कसे बंद केले असे सांगितले.
 
फॅशन शो
लंडन मराठी संमेलनात फॅशन शो करण्यात आला ज्याच्या मध्ये २० लोकल मॉडेल्स ने भाग घेतला होता. डॉ महादेव भिडेंच्या प्रेरणेने आणि प्रियांका कानविंदे, साईश शेटे, सौरभ वळसंकर यांच्या अथक परिश्रमाने हा फॅशन शो अगदी थाटा माटात पार पडला. याच्यात भाग घेणारे कलाकार होते :
कोरिओग्राफर - प्रियांका कानविंदे, सईश शेटे 
आयोजक – डॉ. महादेव भिडेआणि सौरभ वळसंगकर
ध्वनी सहाय्य : मिलिंद देशमुख
मॉडेल : डॉ. अर्चना तापुरीया, विहंग इंगळे, योगेश चौधरी, शर्वरी चिडगुपकर, नवनीत रविशंकर, दीपा सराफ देशपांडे, सचिन देशपांडे, प्रियांका दवे, तन्वी वाईंगणकर, गायत्री सोनावणे, सौरभ सोनावणे, दिना सेला, मीनाक्षी परांजपे, भावना लोटलीकर, रश्मी लखपते तेली, विशाल तेली, लुलजेता गोका, निका खालादकर
 
मराठी शिकवण्याचे महत्व 
भारतीय भाषा संघाचे दिलीप पेडणेकर, संतोष पारकर आणि पंकज अंधारे यांनी येणाऱ्या पिढीला मराठी शिकवण्याचे महत्व एका छोट्या नाट्यछटेने दाखविले ज्याच्यात लहान मुलांनी अगदी सहजपणे क, ख, ग, घ, न अशी सर्व बाराखडी अगदी व्यवस्थित पणे म्हणून दाखविली.
 
लंडनवासीयांची कलाकारांच्या कला-गुणांना मनापासून दाद
आपली कला सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 
अभिनेत्री भार्गवी, नुपूर धैठणकर, स्मिता साळुंके व मानसी महाजन यांनी बहारदार नृत्य सादर केले. गायक हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमाप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड यांची भूमिका असलेल्या ‘हया गोजिरवाण्या घरात’ ह्या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला. तसेच प्रतापजी पवार यांनी कत्थक सादर केले आणि त्यांच्या क्षेत्रात त्यांनी दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल त्यांचा सन्मान केला गेला
कला-गुणांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत नृत्याचा आनंद लुटला. समिर चौगुले आणि प्राजक्ता हनमघर यांच्या "बुलेट एक्सप्रेस" या कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.
या संमेलनाला ४०० शे होऊन अधिक लोकं उपस्थित होते. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या अभूतपूर्व सोहोळ्याचं कौतुक केलं हे विशेष!
 
लंडन मराठी संमेलन २०१७ - मुख्य समिती
सुशील रापतवार (आवाहक), वैशाली मंत्री (उप आवाहक), डॉ गोविंद काणेगावकर, डॉ महादेव भिडे, अनिल नेने, डॉ उत्तम शिराळकर, शार्दुल कुळकर्णी, आदित्य काशीकर, प्रणोती पाटील जाधव
 
लंडन मराठी संमेलन २०१७ चे शिलेदार
लंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) चे शिलेदार ज्यांनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आणि संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने खालील सहकाऱ्यांची नावे आवर्जून घेतली पाहिजे: अर्निका परांजपे (अटकेपार - स्मरणिका संपादिका), निखिल देशपांडे, अजिंक्य भावे, विजेंद्र इंगळे, अंजली शेगुणशी, निका वळसनकर, मयूर चांदेकर, अद्वैत जोशी,चेतन मंत्री, सौरभ वळसनकर, चेतन हरफळे, अरुणा देशमुख, निवेदिता सुकळीकर, संतोष पारकर, अभिजित देशपांडे, हर्षवर्धन सोमण, मिलिंद देशमुख