Lokmat One World Summit: इजिप्तमध्ये आज रंगणार 'लोकमत वन वर्ल्ड समिट' आणि अवॉर्ड सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:58 IST2026-02-06T10:51:27+5:302026-02-06T10:58:24+5:30

Lokmat One World Summit and Awards Egypt 2026: कैरो येथे आयोजन: न्याती ग्रुपच्या सहयोगाने कर्तृत्ववान मान्यवरांचा जागतिक पटलावर होणार सन्मान; इजिप्त-भारतीय संस्कृतीचा मिलाप

'Lokmat One World Summit' and award ceremony to be held in Egypt today | Lokmat One World Summit: इजिप्तमध्ये आज रंगणार 'लोकमत वन वर्ल्ड समिट' आणि अवॉर्ड सोहळा!

Lokmat One World Summit: इजिप्तमध्ये आज रंगणार 'लोकमत वन वर्ल्ड समिट' आणि अवॉर्ड सोहळा!

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: जगभरातील नेतृत्व, उत्कृष्टता आणि नावीन्य यांचा शोध घेऊन 'लोकमत वन वर्ल्ड समिट'मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव केला जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या व्यक्तींना जागतिक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र, गोवा आणि दिल्लीतील क्रमांक एकचे मराठी दैनिक 'लोकमत' हा भव्य सन्मान सोहळा आयोजित करत आहे. हा सोहळा इजिप्तमधील कैरो शहरातील हॉटेल गिला पॅलेस येथे शुक्रवारी (दि. ६) सकाळी ९.३० वाजता पार पडणार आहे.

या सोहळ्यास लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, भारतीय दूतावासाच्या उपमिशन प्रमुख व चार्ज डी' अफेअर्स सी. सुषमा, ज्येष्ठ उद्योगपती हरीश ऑफ, बैंकर तसेच पार्श्वगायिका अमृता फडणवीस, प्रख्यात अभिनेते बोमन इराणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय कलिका स्टील अलॉइज प्रा. लि.चे कार्यकारी संचालक गोविंद गोयल, माबाचे उपाध्यक्ष आणि इजेबी चे अध्यक्ष मोहम्मद अबु बाशा, अभिनेत्री सौंदर्या सर्मा आणि केसायबर एक्सपर्ट्स प्रा. लि. चे संचालक सौरभ आठवले यांचीही उपस्थिती असणार आहे.

"लोकमत वन वर्ल्ड समिट हा केवळ पुरस्कार सोहळा नसून, जगभरातील सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्याा व्यक्तींना एकत्र आणणारा चिचारमंच आहे. भारतातील कर्तृत्वाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, द्वा आगचा प्रयन आहे. विविध संस्कृती, देश आणि क्षेत्रांतील मान्यवरांच्या अनुभवातून नच्या संधी निर्माण होतील, समाज, उद्योग आणि राष्ट्रनिर्मितीस्वठी प्रेरणा देणारा हा सोहळा ठरेल, याचा मला अभिमान आहे", असे लोकमत मिडिया ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी म्हटले.

"जागतिक अर्थव्यवस्थेत केवळ नपच नव्हे, तर मूल्याधिष्ठित विकास महत्वाचा आहे. 'लोकमत वन वर्ल्ड समिटसारखे व्यासपीठ उद्योग, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर सगम घडवते. विविध देशातील अनुभवांची देवाण-घेवाण होऊन शाश्वत विकासाच्या दृष्टीने नये मार्ग सापडतील, भारतीय उद्योजकता आणि नेतृत्य जागतिक स्तटावर पोहोचवण्याचे काम लोकमत सातत्याने करत आहे. ही निश्चितव कौतुकास्पद बाब आहे."- हरीश श्रॉफ, संचालक, मार्केटिंग आणि सेल्स, न्याती ग्रुप

क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून केवळ व्यक्तीचा नव्हे, तर त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे. आपल्या कार्यातून वेगळेपण सिद्ध करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, शाश्वत विकास, सांस्कृतिक वारसा, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्र अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या माध्यमातून भारत आणि इजिप्तच्या संस्कृतीचा मिलाप होणार आहे.

'लोकमत'चा जागतिक पटलावर वेगळा ठसा

महाराष्ट्र, गौवा आणि दिल्ली राज्यातील क्रमांक एकचे मराठी दैनिक म्हणजे 'लोकमत', सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत 'लोकमत'ने जागतिक पातळीवरही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कर्तृत्वचान व्यक्तींना जागतिक मानांकन देत 'लोकमत'ने आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक चर्चा घडवून आणली आहे. 'लोकमत' ग्लोबलच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा जागतिक स्तरावर सन्मान होणे ही निश्चितच अभिमानाची वाय आहे.

Web Title : मिस्र में आज 'लोकमत वन वर्ल्ड समिट' और पुरस्कार समारोह!

Web Summary : कायरो में लोकमत का वन वर्ल्ड समिट वैश्विक नेताओं और नवप्रवर्तकों को सम्मानित करता है। यह आयोजन सहयोग को बढ़ावा देता है, विभिन्न क्षेत्रों में योगदान को पहचानता है और विश्व स्तर पर भारतीय उत्कृष्टता को बढ़ावा देता है। चर्चा में वित्त, स्थिरता, संस्कृति और उद्योग शामिल हैं, जो भारतीय और मिस्र की संस्कृतियों को जोड़ते हैं।

Web Title : Lokmat One World Summit and Awards Ceremony Today in Egypt!

Web Summary : Lokmat's One World Summit in Cairo honors global leaders and innovators. The event fosters collaboration, recognizing contributions to various sectors and promoting Indian excellence worldwide. Discussions span finance, sustainability, culture, and industry, bridging Indian and Egyptian cultures.