लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉड्स २०२५: हाँगकाँगमध्ये देशातील दिग्गजांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 05:34 IST2025-03-27T05:32:54+5:302025-03-27T05:34:22+5:30

चित्रपट अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

Lokmat Global Convention Summit & Awards 2025 Honoring the country stalwarts in Hong Kong | लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉड्स २०२५: हाँगकाँगमध्ये देशातील दिग्गजांचा सन्मान

लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉड्स २०२५: हाँगकाँगमध्ये देशातील दिग्गजांचा सन्मान

फहिम खान, हाँगकाँग: भारत विकासाच्या मार्गावर वेगाने धावत आहे आणि विश्वातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. भारताच्या या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा वैश्विक स्तरावर सन्मान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि गोवा येथील प्रमुख वृत्तपत्र समूह 'लोकमत'द्वारे भव्य 'लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉईस २०२५'चे आयोजन हाँगकाँग येथील शेरेटन तुंग चुंग हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

'लोकमत' द्वारे देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विश्वस्तरीय व्यक्तींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओळख देण्याच्या हेतूने हाँगकाँगमध्ये भव्य 'लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट अँड अवॉईस २०२५'चे आयोजन करण्यात आले होते, या सोहळ्यात अशा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले, ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले असाधारण योगदान दिले आहे. या सोहळ्याचे आयोजन एमआयडीसी, चंद्रकांत पाटील युथ फाउंडेशन आणि स्मिता हॉलिडेजचे सहकार्य प्राप्त झाले.

'लोकमत' द्वारे आयोजित या भव्य 'लोकमत ग्लोवल कन्व्हेंशन समिट अँड अवॉईस २०२५'मध्ये 'भविष्याची दिशा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, वैश्विक व्यापार आणि अर्थव्यवस्था' या विषयावर चिंतन-मनन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय वित्त प्रणाली, सतत विकास, सांस्कृतिक वारसा, पायाभूत विकास, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रासारख्या विषयांवर विशेषज्ञांनी आपल्या विचारांचे आदान प्रदान केले. है व्यासपीठ व्यापार, नवाचार आणि आर्थिक प्रगतीला वाव देण्यासाठी एक उत्कृष्ट संधी म्हणून सिद्ध झाले. लोकमतच्या या आंतरराष्ट्रीय अवॉर्ड वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक लोकमतचे सिनिअर जनरल मॅनेजर (ऑपरेशन) आशिष जैन यांनी केले. संचालन प्रसिद्ध अभिनेत्री अहाना कुमरा हिने केले आणि आभार लोकमतचे महाव्यवस्थापक (अँड सेल्स उत्तर महाराष्ट्र आणि गोवा) आसमान सेठ यांनी मानले.

मेहनत आणि जिद्दीची कहाणी

हाँगकाँगमध्ये झालेल्या लोकमतच्या या सोहळ्यात प्रदान करण्यात आलेली ट्रॉफी चोवीस चमकत्या रेषांनी सुशोभित आहे, जे प्रत्येक दिवस आणि रात्रीच्या मेहनतीचे प्रतीक आहेत. प्रत्येक धारेत त्या हातांची एक गूढ कहाणी दडलेली आहे, जी स्वप्नांना आकार देते. संकट आणि कठीण संघर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातही ते अटल आणि मजबूत राहतात. त्यांच्या प्रयत्नांचा संघर्ष एक स्फूर्तीदायक ठसा उमटवतो. अंधकारात त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश निराशेवर मात करून नव्या आशेचा किरण निर्माण करतो. ही ट्रॉफी त्यांच्या साहस आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

Web Title: Lokmat Global Convention Summit & Awards 2025 Honoring the country stalwarts in Hong Kong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.