इस्लामाबाद- "असीम मुनीर, जर तू उघडपणे इस्रायलला साथ देणार असाल तर आम्हीही इराणला साथ देऊ. मग पाहू तू आम्हाला इराणला पाठवता की आम्ही तुला इस्रायलला पाठवतो..." अशी थेट धमकीच पाकिस्तानातील शिया मौलानाने दिली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या एका विधानाने पाकिस्तानात संताप पसरला आहे. शिया समुदायाने मुनीर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. असीम मुनीर यांच्याविरोधात कुठल्याही थराला जाण्याची तयारी शिया समुदायाने केली आहे.
शेख जावेद यांच्यानंतर आणखी एका मौलानाने असीम मुनीर यांना खडे बोल सुनावले आहेत. जर इराणवर इतकेच प्रेम असेल तर तिथेच जा असं मुनीर यांनी म्हटलं होते. त्यावर तुम्हाला इस्रायलसोबत मैत्री निभवायची असेल तर तुम्ही इस्रायलला जाऊन मरा असं मौलानाने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील (पीओके) गिलगिट येथे लोकांचे आंदोलन सुरू आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी शिया धर्मगुरूंना "ज्यांना इराण इतका प्रिय आहे त्यांनी इराणला जावे," असे सांगून एक सांप्रदायिक आणि राजकीय वाद निर्माण केला आहे. रावळपिंडी येथील एका इफ्तार कार्यक्रमात केलेली ही वक्तव्ये शिया धर्मगुरूंनी अपमानकारक आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.
शिया धर्मगुरूंनी पाकिस्तानी लष्करावर अमेरिका आणि इस्रायलच्या सांगण्यावरून पाकिस्तानच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आणि सरकार उलथवून देशाचा नाश करत असल्याचा आरोप केला आहे. जर तुम्हाला तुमचे मालक, इस्रायल आणि अमेरिका इतके प्रिय असतील, तर पाकिस्तान सोडून जा असं पाकिस्तानच्या शिया उलेमा परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष अल्लामा सय्यद सिबतेन हैदर सबझवारी यांनी मुनीर यांना सांगितले. इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांच्या आणि अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ शिया समुदायाने केलेल्या आंदोलनांनंतर मुनीर यांनी जे विधान केले होते. त्यावरून वाद पेटला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची, स्कार्दू आणि इस्लामाबाद येथे सुरक्षा दलांनी खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली. ज्यात किमान ३५ जण ठार झाले. शिया समुदाय अयातुल्लांच्या पदाला आपले सर्वोच्च धार्मिक मार्गदर्शक (मरजा-ए-तकलीद) मानतो, ज्यांचे फतवे आणि मार्गदर्शन त्यांच्या दैनंदिन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आचरणाचे मार्गदर्शन करतात. मुनीर यांच्या विधानामुळे शिया धर्मगुरू संतप्त झाले आहेत. त्यांच्या मते पाकिस्तानी शिया हे देशाच्या इतिहासाशी आणि राजकारणाशी खोलवर जोडलेले आहेत आणि त्यांना केवळ बाहेरचे किंवा ज्यांची निष्ठा दुसरीकडे आहे असे लोक म्हणून चित्रित केले जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
Web Summary : Pakistani Shia clerics are enraged by army chief Asim Munir's remarks perceived as pro-Israel. They threaten retaliation, siding with Iran if Munir supports Israel. Tensions escalate after protests and accusations against the army.
Web Summary : पाकिस्तानी शिया धर्मगुरु सेना प्रमुख असीम मुनीर की इस्राइल समर्थक मानी जाने वाली टिप्पणियों से नाराज हैं। उन्होंने मुनीर द्वारा इस्राइल का समर्थन करने पर ईरान का साथ देने की धमकी दी है। विरोध और सेना पर आरोपों के बाद तनाव बढ़ गया है।