शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 09:09 IST

संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात, लवकरच सरकार स्थापन करणार

ठळक मुद्देअफगाणिस्तानात लवकरच सरकारची घाेषणा करण्यात येणार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने पुन्हा सांगितले आहे. 

काबूल : तालिबनला आतापर्यंत पंजशीर खाेऱ्यातून कडवा प्रतिकार झाला. मात्र, हा प्रांत अखेर पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला आहे. तालिबानने पंजशीरचा ताबा घेतल्याचे जाहीर केले. यापुढे काेणत्याही बंडखाेरांना साेडणार नाही, असा इशाराही तालिबानने दिला आहे. तालिबानी शिरल्यानंतर माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून पळ काढला असून, ते ताजिकीस्तानमध्ये गेल्याचे वृत्त आहे. तर, लवकरच अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल, असे तालिबानने म्हटले आहे.

पंजशीरमध्ये राहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की रविवारी रात्री हजाराेंच्या संख्येने तालिबान्यांनी पंजशीर प्रांतातील आठ जिल्ह्यांचा ताबा घेतला. सर्व जिल्हा मुख्यालय, पाेलीस मुख्यालय तसेच इतर कार्यालयांचा तालिबानने ताबा घेतला. तालिबानचा विराेध करणाऱ्या नॅशनल रेजिस्टंस फ्रंट ऑफ अफगाणिस्तानसाेबत झालेल्या तुंबळ युद्धात शेकडाे जणांना ठार केल्याचा दावाही तालिबानने केला. तालिबानचा प्रतिकार करणाऱ्या गटाचा प्रमुख अहमद मसूद याचा अतिशय जवळचा फहीम दश्ती याचाही रविवारच्या युद्धात मृत्यू झाला. त्यानंतर पंजशीरच्या विराेधी गटाने तालिबानसाेबत युद्धबंदीची मागणी करून चर्चेद्वारे समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. 

सत्तासंघर्ष लवकरच मिटण्याची शक्यताnअफगाणिस्तानात लवकरच सरकारची घाेषणा करण्यात येणार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने पुन्हा सांगितले आहे. तालिबानच्याच वेगवेगळ्या गटांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सरकार स्थापनेला विलंब हाेत आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि अनस हक्कानी यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याची चर्चा हाेती. nगेल्या आठवड्यात काबूलमध्ये झालेला गाेळीबार हा याच दाेन नेत्यांच्या सत्तासंघर्षातून झाला हाेता. त्यात बरादर हे जखमी झाल्याचेही सांगण्यात आले हाेते. मात्र, काेणतेही मतभेद नसल्याचाही दावा त्याने केला आहे. nताे म्हणाला, की पंजशीर जिंकल्यानंतर देश आता युद्धमुक्त झाला आहे. लवकरच एक अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. त्यात नंतर बदलही केले जाऊ शकतात. सध्या काही तांत्रिक मुद्यांवर काम सुरू आहे. त्यातून ताेडगा निघाल्यानंतर सरकारची घाेषणा करण्यात येईल.

सालेह पंजशीर साेडून पळाले ?विद्राेही गटाचे नेतृत्व करणारे अमरुल्ला सालेह हे पंजशीर साेडून पळाल्याचा दावा तालिबानने केला आहे. ते ताजिकीस्तानला गेल्याची दाट शक्यता आहे. मात्र, काही जणांनी हा दावा फेटाळला असून, सालेह हे भूमिगत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमी ट्विटरवर सक्रिय असणारे सालेह यांनी सद्यस्थितीबाबत काेणतीही माहिती दिलेली नाही.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानKabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोटTalibanतालिबान