अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे शिक्षणासाठी गेलेल्या एक २२ वर्षी भारतीयविद्यार्थी साकेत श्रीनिवायसैय्या याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासैय्या हा गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता होता. कर्नाटकमधील सहिवासी असलेला साकेत हा कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे केमिकल आणि बायोमोलेक्युलर इंजीनियरिंगचं शिक्षण घेत होता, तसेच ९ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता.
या घटनेबाबत सोशल मीडियावरून अधिक माहिती देताना वाणिज्य दूतावासाने सांगितले की, स्थानिक पोलिसांनी बेपत्ता असलेला विद्यार्थी साकेत श्रीनिवासैय्या याचा मृतदेह सापडल्याचे सांगितले आहे. या अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी वाणीज्य दूतावास या कुटुंबाला सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी तत्पर आहे. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून साकेत याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. आमचे कौन्सुलर अधिकारी साकेत याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.
साकेत श्रीनिवासैय्या हा ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. तो बर्कले हिल्स परिसरातील लेक अंजाजवळ तो शेवटचा दिसला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच सुमारे सहा दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासैय्या हा आयआयटी मद्रासचा माजी विद्यार्थी होता. तसेच बर्कलेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होता.
Web Summary : Saket Srinivasaiyya, an Indian student in California, was found dead after being missing for six days. He studied at UC Berkeley. Authorities are assisting the family and working to repatriate his remains to India. He was last seen near Lake Anza.
Web Summary : कैलिफ़ोर्निया में पढ़ रहे भारतीय छात्र साकेत श्रीनिवासैय्या छह दिनों से लापता होने के बाद मृत पाए गए। वह यूसी बर्कले में पढ़ते थे। अधिकारी परिवार की सहायता कर रहे हैं और उनके अवशेषों को भारत वापस भेजने के लिए काम कर रहे हैं। उन्हें आखिरी बार लेक अंजा के पास देखा गया था।