शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खेळ सुरू...! पंतप्रधान ओलींची खुर्ची गोत्यात, भारतावर काढली भडास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 17:52 IST

कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

ठळक मुद्देराजीनामा न दिल्यास, आपण पक्ष फोडू, असा इशाराही प्रचंड यांनी ओलींना दिला आहे.कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

काठमांडू -नेपाळचेपंतप्रधान केपी शर्मा ओली यांची खुर्ची गोत्यात आली आहे. सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये सध्या गोंधळ माजला आहे. देशभरात सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान ओली आता कट्टर राष्ट्रवादाचा प्रयोग करू पाहत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या गोंधळासाठी नाव न घेता, थेट भारतालाच दोशी ठरवले आहे. यासंदर्भात त्यांनी, 'एक दूतावास माझ्या सरकारविरोधात हॉटेलमध्ये बसून कट आखत असल्याचा आरोप केला आहे.

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

भारतावर नाव न घेता केला आरोप -मदन भंडारी यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान केपी शर्मा ओली म्हणाले, भलेही त्यांना पंतप्रधान पदावरून हटविण्याचा खेळ सुरू असो, मात्र ते अशक्य आहे. ओली यांनी दावा केला होता, की काठमांडूच्या एका हॉटेलमध्ये त्यांना पदावरून बाजुला सारण्यासाठी बैठक सुरू आहे. तसेच यात एक दुतावासही सक्रिय आहे. असे म्हणताना ओली यांचा इशारा भारताकडे होता.

गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन

नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही -ओली यांनी दावा केला, की भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवण्यासंदर्भातील घटनादुरुस्तीपासून त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे. मला पदावरून बाजूला करण्यासाठी उघडपणे प्रयत्न होत आहेत. नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही. कुणीही विचार केला नव्हता, की नकाशा छापण्यासाठी एखाद्या पंतप्रधानाला पदावरू हटवले जाईल.

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

ओलींच्या पक्षात 'प्रचंड' वादळ -पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा पक्ष फुटण्याच्या स्थितीत आहे.  नेपाच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी चेअरमन पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधान ओलींवर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा न दिल्यास, आपण पक्ष फोडू, असा इशाराही प्रचंड यांनी ओलींना दिला आहे. तसेच यावेळी ओली आपली खुर्ची वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते यासाठी नेपाळी सैन्याची मदत घेत आहेत.  असा आरोपही प्रचंड यांनी केला आहे.

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

ओली यांचा राजीनामा देण्यास नकार -कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधानborder disputeसीमा वादKathmanduकाठमांडू