शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

किशनगंगा प्रकरणी जागतिक बँकेचा पाकिस्तानला दणका, भारताचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:05 IST

भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला आहे.

इस्लामाबाद -  भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला आहे. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने किंशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.  जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग यांनी पाकिस्तानने किशनगंगा विवादाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा आपला निर्णय बदलावा असा सल्ला गेल्या आठवड्यात  दिल्याचे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने  प्रसिद्ध केले आहे. सिंधू नदीवरील भारताचे अनेक प्रकल्प हे जागतिक बँकेच्या मध्यस्तीने 1960 साली झालेल्या सिंधू पाणी कराराचे भंग करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून नेहमीच करण्यात येत असतो.  जागतिक बँकेने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप निश्चित करण्यासाठी हा करार करवून घेतला होता. सद्यस्थितीत सिंधूनदीच्या पाण्यावर पाकिस्तानमधील सिंचनाखालील 80 टक्के शेतीला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिंधू नदीवर धरण बांधल्यास नदीचा मार्ग बदलेल तसेच पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीमध्येही कमालीची घट होईल, अशी भीती व्यक्त करत या वादाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात व्हायला हवी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. दुसरीकडे भारताने मात्र सिंधू पाणी करारानुसार जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा आपल्याला अधिकार आहे. तसेच यामुळे नदीचा प्रवाह आणि पाणीपातळीमध्ये कोणत्याही प्रकारची घट होणार नसल्याचा दावा केला आहे. या धरणाच्या आराखड्याबाबत पाकिस्तानसोबत असलेला वाद सोडवण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :riverनदीWaterपाणीDamधरणPakistanपाकिस्तान