Kim Jong Un: किम जोंग उनने वाढवलं जगाचं टेन्शन, अणुबॉम्बबाबत केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 12:53 IST2022-11-27T12:52:39+5:302022-11-27T12:53:56+5:30
Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणारी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाचं अंतिम लक्ष्य हे जगातील सर्वात शक्तिशाली अणुशक्ती मिळवण्याचं आहे, असं म्हटलं आहे.

Kim Jong Un: किम जोंग उनने वाढवलं जगाचं टेन्शन, अणुबॉम्बबाबत केली मोठी घोषणा
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणारी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाचं अंतिम लक्ष्य हे जगातील सर्वात शक्तिशाली अणुशक्ती मिळवण्याचं आहे, असं म्हटलं आहे. उत्तर कोरियाच्या सर्वात मोठ्या बॅलेस्टिक मिसाईलच्या परीक्षणावेळी उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देताना किम जोंगने हे विधान केले आहे.
किम जोंग उनचं हे वक्तव्य उत्तर कोरियाच्या ह्यासोंग-१७ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलच्या चाचणीचं निरीक्षण केल्यानंतर आणि १८ नोव्हेंबर रोजी अण्वस्त्रांसह अमेरिकेकडून असलेल्या आण्विक धोक्याचा सामना करण्याचा संकल्प केल्यानंतर समोर आलं आहे.
किमने सांगितले की, अणस्त्राची निर्मिती राज्य आणि आणि लोकांची गरिमा आणि सार्वभौमत्व यांचं भक्कमपणे संरक्षण करण्यासाठी आहे. तसेच याचं अंतिम लक्ष्य जगातील सर्वात शक्तिशाली सामरिक शक्ती बनणे हे आहे. यावेळी किम जोंगने ह्यासोंग-१७ ला जगातील सर्वात शक्तिशाली सामरिक हत्यार म्हणून संबोधित केले. तसेच उत्तर कोरियाला जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यशक्ती बनवण्याच्या क्षमतेचं प्रदर्शन करते.
तसेच किमने सांगितले की, उत्तर कोरियाच्या शास्त्रज्ञांनी बॅलेस्टिक क्षेपणाश्त्रांवर अण्वस्त्रे लावण्याच्या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने अमेरिकेच्या धमक्या आणि इशाऱ्यांना न जुमानता कोरियाई द्विपामध्ये बॅलेस्टिक मिसाईल डागली होती. मिसाईल डागण्यासोबतच उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने पहिल्यांदाच आपल्या जीवनाशी संबंधित मोठा गौप्यस्फोट केला आहे.