'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:11 IST2026-03-24T08:09:07+5:302026-03-24T08:11:09+5:30

Kim Jong Un Challenge Donald Trump: किम जोंग उन यांनी अण्वस्त्र धोरण केले अधिक कडक. दक्षिण कोरियाला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित करून लष्करी बजेटमध्ये १५.८% वाढ. ट्रम्प प्रशासनाला दिले थेट आव्हान. वाचा सविस्तर बातमी.

Kim Jong Un Challenge Donald Trump: 'No compromise on nuclear weapons now!' Kim Jong Un's direct warning to Trump administration; South Korea designated as 'biggest enemy' | 'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी संसदेत (सुप्रीम पीपुल्स असेंबली) बोलताना देशाच्या अणू धोरणात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा केली आहे. "उत्तर कोरिया हे एक कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे," असे ठणकावून सांगत त्यांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.

किम जोंग उन यांनी अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाच्या बदल्यात मिळणारी आर्थिक मदत किंवा सुरक्षेची हमी देणारे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "अण्वस्त्रांमुळेच युद्ध थांबले असून, त्यामुळे देशाला आर्थिक विकास आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली आहे," असे किम यांनी स्पष्ट केले.

बजेटमध्ये संरक्षण खर्चात मोठी वाढ
उत्तर कोरियाने २०२६ च्या बजेटमध्ये संरक्षण खर्चात मोठी वाढ केली असून, एकूण खर्चाच्या १५.८% हिस्सा केवळ लष्करासाठी राखून ठेवला आहे. अणू युद्ध लढण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दक्षिण कोरिया आता 'शत्रू' राष्ट्र
दशकांपासून सुरू असलेले शांततापूर्ण पुनर्मिलनाचे धोरण सोडून देत किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला आपला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित केले आहे. जर उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले, तर कोणतीही दयामाया न दाखवता 'अत्यंत निर्घृण' उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवी आर्थिक पंचवार्षिक योजना
लष्करी ताकदीसोबतच किम यांनी उद्योगांचे आधुनिकीकरण, वीज आणि कोळसा उत्पादनात वाढ आणि गृहनिर्माण प्रकल्पांवर भर देणारी नवीन पंचवार्षिक आर्थिक योजना सादर केली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही किम यांना शुभेच्छा संदेश पाठवून दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे.

Web Title : परमाणु हथियारों पर समझौता नहीं! किम की ट्रंप को चेतावनी, दक्षिण कोरिया दुश्मन।

Web Summary : किम जोंग उन ने उत्तर कोरिया को परमाणु शक्ति घोषित किया, निरस्त्रीकरण वार्ता खारिज की। उन्होंने दक्षिण कोरिया को प्राथमिक दुश्मन बताया और संप्रभुता उल्लंघन पर कड़ी प्रतिक्रिया की कसम खाई। उत्तर कोरिया ने रक्षा खर्च बढ़ाया और रूस के साथ संबंध मजबूत करते हुए एक नई आर्थिक योजना का अनावरण किया।

Web Title : No Nuclear Deal! Kim Warns Trump, Declares South Korea Enemy.

Web Summary : Kim Jong Un declared North Korea a nuclear power, rejecting denuclearization talks. He designated South Korea as the primary enemy, vowing a harsh response to any sovereignty breach. North Korea increased defense spending and unveiled a new economic plan while strengthening ties with Russia.