लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:21 PM2022-03-13T19:21:50+5:302022-03-13T19:23:51+5:30

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही.

killer of osama bin laden called vladimir putin crazy gave terrible warning russia ukraine war | लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

Next

वॉशिग्टंन- 

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही. यासोबतच नेव्ही सीलने रशियाच्या आक्रमणाबाबत आपल्याच देशाच्या भूमिकेवरही टीका केली आहे. 

मोंटानाचा रॉब ओ नील हे SEAL च्या टीम सिक्सचा भाग होते. ज्या टीमनं 2010 मध्ये अबोटाबादमध्ये 9/11 चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला ठार मारले होते. रॉब ओ नील यांनी 16 वर्षात 400 युद्ध मोहिमा पूर्ण केल्या आहेत. युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारणं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांचा संयम सुटल्याचं लक्षण आहे. रॉब यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला आपल्या देशाच्या प्रतिक्रियेवर टीका केली. अमेरिकेने या प्राणघातक हल्ल्याला कमकुवतपणं उत्तर दिलं, असं रॉब यांनी म्हटलं आहे. 

'डेली मेल'च्या वृत्तानुसार अमेरिका पुतीनला रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या हवामान बदलाच्या अजेंड्याबाबत अधिक चिंतीत दिसत असल्याची टीका रॉब ओ नील यांनी केली आहे. रशिया आणि चीन आज आपल्यावर हसत आहेत, असंही ते पुढे म्हणाले. ओ'नीलचा दावा आहे की बहुतेक अमेरिकन लोकांना युद्धाबद्दल त्यांचे विचार टीव्ही आणि सोशल मीडियावरून मिळतात. अमेरिकेने रशियाबाबत कठोर भूमिका घ्यावी असे लोकांना वाटते. 

लादेनच्या डोक्यात झाडल्या होत्या तीन गोळ्या
मे 2011 मध्ये अल कायदाचा प्रमुख आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याचे मिशन पार पडले होते. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या नेव्ही सील टीमच्या रॉब ओ'नीलने ओसामावर शेवटचा हल्ला केला होता. नीलने दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या होत्या. या संघातील कोणत्याही सदस्याची ओळख उघड झाली नव्हती. 

नीलची ओळख अशी उघड झाली
अमेरिकन वृत्तवाहिनी फॉक्सने नीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आली. रॉब ओ'नील यांचे पूर्ण नाव रॉबर्ट ओ'नील आहे. सध्या तो नेव्ही सीलचा भाग नाही. या मुलाखतीत ओ नीलने मिशन ओसामाशी संबंधित अनेक किस्से समोर आणले होते. 

Web Title: killer of osama bin laden called vladimir putin crazy gave terrible warning russia ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.