शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:03 IST

इराण आणि इस्राइलमधील युद्धानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.

इराण आणि इस्राइलमधील युद्धानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. ते आशूरा निमित्त आयोजित शोकसमारंभात उपस्थित होते.

इराणी सरकारी दूरदर्शनने या कार्यक्रमाची थेट चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये खामेनी पारंपरिक काळ्या पोशाखात कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना दिसले होते. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित जमावाने “लब्बैक या हुसैन” अशा घोषणांनी सभागृह दणाणून टाकले.

इराणचे 'सुप्रीम लीडर' खामेनी ही उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे, कारण १३ जूनपासून सुरू झालेल्या इराण-इस्राइल संघर्षानंतर खामेनी प्रथमच जनतेसमोर आले आहेत. यापूर्वी त्यांनी केवळ आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडीओ संदेश जाहीर केले होते.

गैरहजेरीमुळे उठले होते अनेक प्रश्न!खामेनी काही काळ सार्वजनिकरीत्या न दिसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच नेतृत्वाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. विरोधक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा असा अंदाज होता की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर खामेनी सुरक्षित स्थळी, कदाचित बंकरमध्ये लपले असावेत.

मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात आले होते. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायली हवाई हल्ले अधिक तीव्र होते, त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती.

नेतृत्वाच्या स्थैर्याचा संदेशराजकीय विश्लेषकांच्या मते, खामेनी यांची ही सार्वजनिक उपस्थिती केवळ धार्मिक स्वरूपाची नसून, ती एक प्रतीकात्मक राजकीय संदेशही आहे. या माध्यमातून इराणकडून देशांतर्गत जनतेला तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की, युद्धाच्या स्थितीतदेखील देशाचे नेतृत्व सक्रिय, स्थिर आणि नियंत्रणात आहे.

या सार्वजनिक उपस्थितीमुळे खामेनी यांच्या आरोग्याबाबत पसरलेले संशय दूर झाले असून, इराणमध्ये नेतृत्व अजूनही सशक्त असल्याचा संदेशही जगभरात पोहोचता झाला आहे.

टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्धIsraelइस्रायल