शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एका ट्विटमुळे झाली तिची फजिती, शाळेत यावं लागलं ख्रिसमस ट्री बनून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:52 IST

ट्विटरच्या ऑफिशिअल हँडलवरुन आवाहन केल्यामुळे त्या मुलीचा फोटो हजारांत रिट्विट झाला आणि तिला आपला शब्द पुर्ण करावा लागला.

ठळक मुद्देख्रिसमस अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे.नेटिझन्सही विविध कल्पना लढवून ख्रिसमस साजरा करण्यासाठी तयार होताहेत.सोशल मीडियावर काहीही होऊ शकत. नेटिझन्स काहीही करू शकतात. त्यानुसार तिला तिचा शब्द पूर्ण करणं भाग पडलं.

अलबमा : ख्रिसमस अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. तसंच नेटिझन्सही आता सज्ज झालेत. विविध कल्पना लढवून ते ख्रिसमस साजरा करण्यासाठी तयार होताहेत. त्याचप्रमाणे एका तरुणीनेही एक शक्कल लढवली आणि ती शक्कल तिच्याच अंगलट आली आहे. 

 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील युनिर्व्हिसिटी ऑफ अलबमामध्ये शिकणारी केल्सी हॉल या २० वर्षीय तरुणीने ख्रिसमस ट्रीचा वेश परिधान करून फोटो ट्विटवर अपलोड केला होता. त्याखाली या फोटोला तिने दिलेला कॅप्शन असा होता की, ' या फोटोला जर १००० रिट्विट मिळाले तर मी असा वेष माझी सेमिस्टर संपेपर्यंत परिधान करेन'. सुरुवातीला तिला वाटलं की या फोटोला १००० रिट्विट नाही मिळणार. पण सोशल मीडियावर काहीही होऊ शकत. नेटिझन्स काहीही करू शकतात. बघता बघता तिचे फोटो ३० हजार वेळा रिट्विट आणि ५४ हजार लाईक्स मिळाले. आता तिने केलेलं आवाहन पूर्ण करणं तिचं कर्तव्य होतं. पण तिने आपलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. झाली की नाही पंचाइत? हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाल्यावर तिही अचंबित झाली. आता आपल्याला आपला शब्द पूर्ण करावा लागणार या भीतीने तिने सरळ मी हे करू शकत नाही असं ट्विटरवर सांगितलं. एका अर्थाने तिनं प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लढवलेली शक्कल तिच्याच अंगलट आली. 

 

या सगळ्या प्रकारात खुद्द ट्विटरचे ऑफिशिअल हँडलही सहभागी होतं. तिने जेव्हा पहिला फोटो पोस्ट करून १००० रिट्विट देण्याचा आवाहन केलं तेव्हा खुद्द ट्विटरच्या ऑफिशिअल हँडलवरूनही तो फोटो रिट्विट झाला आणि बघता बघता सगळ्यांपर्यंत तो पोहोचला. आता तिच्या फोटोला हजाराहून रिट्विट मिळाले म्हणजे तिने तिचं आश्वासन पूर्ण करणं भाग होतं. पण तिनं असं करण्यास चक्क नकार दिला. मी असं करू शकत नाही, असं टि्वट करून तिनं पुन्हा नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं. 

 

तिच्या या नकारावर नेटिझन्सने बरीच टीका केली. खुद्द ट्विटरचं ऑफिशिअल हँडल या  सगळ्या प्रकारात  सहभागी असल्यानं तिला तिचं आश्वासन पूर्ण करणं भाग ठरलं. शेवटी तिने तिचा हा टास्क पूर्ण करायचा ठरवला.

 

तिच्या सेमिस्टरपर्यंत ख्रिसमस ट्रीचा वेश परिधान करण्यासाठी ती राजी झाली. तिने तिचे ख्रिसमस ट्रीचा वेष  परिधान केला आणि चार दिवस ती ते फोटो ट्विटवर अपलोड करत होती. त्यामुळे, तुम्हीही जर सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याकरता अशा काही युक्त्या लढवत असाल तर सावधान. कारण नेटिझन्स कोणालाही तोंडावर पाडू शकतात. तुम्ही लढवलेली शक्कल तुमच्याच अंगलट येऊ शकते. जे आश्वास तुम्ही पूर्ण करू शकता, तेच आश्वासन द्या, नाहीतर केल्सी हॉलसारखी कुंचबना तुमचीही होऊ शकते. 

इतर जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा. 

टॅग्स :Twitterट्विटरUSअमेरिकाTrollट्रोलChrismasख्रिसमसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल