भयंकर! तुटलेल्या सीट, विखुरलेलं सामान, मृतदेहांचा खच, अन्...; अंगावर काटा आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 08:25 IST2024-12-26T08:24:27+5:302024-12-26T08:25:24+5:30
कझाकिस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान क्रॅश झालं. या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जणांचा सुदैवाने जीव वाचला आहे.

फोटो - आजतक
कझाकिस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान क्रॅश झालं. या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जणांचा सुदैवाने जीव वाचला आहे. या भीषण अपघाताचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच दरम्यान या अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाने काढलेला व्हिडीओ खूप व्हायरल होत असून विमानातील परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे.
विमानातील एका व्यक्तीने या अपघातानंतरचं दृश्य आपल्या फोनवर रेकॉर्ड केलं आहे. केबिनच्या आतील खराब स्थिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अनेक जण विमानात इकडे तिकडे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विमानाच्या आतील व्हिज्युअलमध्ये असं दिसतं की सीट्स पूर्णपणे तुटलेल्या आहेत, सर्व सामान इकडे-तिकडे पसरलेलं आहे.
या घटनेच्या आणखी एका व्हिडिओमध्ये विमानाला लागलेली आग विझवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आग विझल्यानंतर काही लोक विमानातून बाहेर पडत आहेत, लोक खूप अस्वस्थ आहेत. बचाव पथक विमानात अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढताना दिसत आहे.
A surviving passenger from the Aktau plane crash manages to capture footage of inside the cabin pic.twitter.com/shIblEmV1d
— RT (@RT_com) December 25, 2024
विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर हा अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान विमानाला आग लागली आणि त्याचे दोन तुकडे झाले. हे दृश्य इतकं भीषण होतं की अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह लांबवर विखुरलेले दिसले. जखमी मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत होते.
अझरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइट E190AR ने बाकू विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.२८ वाजता उड्डाण केलं. सुमारे तासभर उड्डाण केल्यानंतर हे विमान रशियातील चेचन्या येथील ग्रोंजी विमानतळावर उतरणार होतं. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच ते एका पक्ष्याला धडकलं.
विमानात ६७ प्रवासी होते, त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी बचावले, असे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये अझरबैजानी नागरिक, रशियन नागरिक, कझाक नागरिक आणि किर्गिझ नागरिकांचा समावेश आहे. दोन्ही पायलटसह विमानात पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.