काबूल पुन्हा हादरले, कारमध्ये भीषण बाँबस्फोट चार ठार
By Admin | Updated: August 10, 2015 16:15 IST2015-08-10T13:58:01+5:302015-08-10T16:15:24+5:30
अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर बाँबस्फोटांनी पुन्हा हादरले असून काही वेळापूर्वीच काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका कारमध्ये बाँबस्फोट झाला. या भीषण बाँबस्फोटात
काबूल पुन्हा हादरले, कारमध्ये भीषण बाँबस्फोट चार ठार
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. १० - अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर बाँबस्फोटांनी पुन्हा हादरले असून काही वेळापूर्वीच काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका कारमध्ये बाँबस्फोट झाला. या भीषण बाँबस्फोटात चार नागरीक ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. बाँबस्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
घटनास्थळाजवळ उपस्थित असलेल्या सुरक्षा जवानाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट विमानतळाजवळील मोठा शस्त्रसाठा असलेल्या वाहनांना लक्ष्य करून घडवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही शुक्रवारी काबूलमध्ये तीन ठिकाणी झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ३५ हून अधिक नागरिक ठार तर शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले होते.
स्फोट झाल्यानंतर काही क्षणातच घटनास्थळी पोलिस, रुग्नवाहिका मदतीसाठी पोहचल्या. हा बाँबस्फोट विमानतळाजवळील चेक नाक्यावर झाला. स्फोट झाल्यानंतर तिथे आगीचे ताडंव उभे राहिले. आत्तापर्यंत चार नागरीकांचे मृतदेह मिळाले आहेत. तर जखमींना जवळील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे.