शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Kabul Airport Explosion: दहशतवाद्यांना सोडणार नाही; जो बायडेन यांचा आयएसआयएसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 6:26 AM

Kabul Airport Bomb Blast: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले. याची जबाबदारी आयएसआयएस दहशतवादी संघटनेने घेतली असून या हल्ल्यात 12 अमेरिकी सैनिकांसह 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्याची शिक्षा त्यांना देऊ, असा इशारा दिला आहे. (Twelve US servicemen were killed and 15 injured in the attacks in Kabul. )

बायडेन म्हणाले, आम्ही माफ करणार नाही, विसरणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून मारू आणि शिक्षा देऊ. आम्ही अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांना वाचविणार आहोत. तसेच अफगाण सहकाऱ्यांना बाहेर काढी. आमचे मिशन सुरुच राहिल. काबुल विमानतळावर झालेल्या या हल्ल्यात अद्याप तालिबान आणि आयएसआयएस दरम्यान काही संबंध आढळलेला नाही. 

बायडेन यांनी तीनवेळा हल्ल्याचा संशय व्यक्त केलेलाकाबुल विमानतळावर आयएसआयएस हल्ला करण्याची शक्यता बायडेन यांनी तीनवेळा व्यक्त केली होती. 20 ऑगस्टला त्यांनी विमानतळावर किंवा त्याच्या आजुबाजुला असलेल्या कोणत्याही दहशतवादी संकटावर नजर ठेवून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी आहेत, जे जेल तोडल्यानंतर बाहेर पडले आहेत, असे म्हटले होते. 

15 सैनिक जखमीकाबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन ब़ॉम्बस्फोट झाले यामध्ये 12 अमेरिकी सैनिक ठार झाले. रात्री उशिरा अमेरिकी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. यामध्ये 11 मरीन आणि एक नेव्हीचा सैनिक आहे. तर 15 सैनिक जखमी झाले आहेत. सुरुवातीला 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, नंतर हा आकडा 60 पर्यंत वाढला. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.

‘आयसिस’च्या खाेरासान गटाने हा हल्ला केल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी हा आत्मघातकी हल्ला केला. त्यापैकी दाेन मानवी बाॅम्ब हाेते. त्यांनी स्वत:ला बाॅम्बस्फाेटाने उडविले, तर तिसऱ्या दहशतवाद्याने बेछूट गाेळीबार सुरू केला. त्याने एका उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या दिशेनेही गाेळीबार केला. मात्र, विमान सुखरूप उडाले. पहिला बाॅम्बस्फाेट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखाेर लाेकांच्या गर्दीत शिरला, तर दुसरा स्फाेट हाॅटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून ब्रिटनचे सैनिक तेथे मुक्कामाला आहेत. बाॅम्बस्फाेट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गाेंधळ झाला. स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना कचऱ्याच्या गाड्यांमध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले.  बाॅम्बस्फाेट अतिशय तीव्र हाेते.   त्यामुळे मृतांच्या शरीराचे तुकडे झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही जणांनी याबाबतची छायाचित्रे आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Kabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोटAfghanistanअफगाणिस्तानISISइसिस