शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:28 IST

अमेरिकेतील जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अ‍ॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अ‍ॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे.पीडित महिलांचे वकील मार्क लॅनियर यांनी सांगितले की, मिसुरी प्रांतातील सेंट लुईस येथील ज्युरी न्यायालयाने हा निर्णय दिला. ज्युरींमध्ये सहा पुरुष व सहा महिलांचा समावेश होता. सहा आठवड्यांची सुनावणी व आठ तास विचारविनिमय केल्यानंतर ज्युरींनी पीडित महिलांच्या बाजूने निर्णय दिला. महिलांना मिळणाºया रकमेत ५५0 दशलक्ष नुकसानविषयक भरपाई आणि ४.१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेची दंडात्मक भरपाई यांचा समावेश आहे.वैयक्तिक आरोग्यासाठी वापरलेल्या कंपनीच्या पावडरमुळे आपणास गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे महिलांचे म्हणणे होते. त्यांचे वकील मार्क लॅनियर यांनी सांगितले की, आपल्या टाल्क पावडरमध्ये अ‍ॅसबेसटॉसचे अंश आहेत, हे सत्य जॉन्सन अँड जॉन्सनने तब्बल ४0 वर्षे दडवून ठेवले. या निर्णयामुळे कंपनीचे संचालक मंडळ जागे होईल आणि अ‍ॅसबेसटॉस, टाल्कम आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांच्यातील संबंधाची योग्य माहिती ते वैद्यकीय समुदाय आणि लोकांना देईल, अशी आम्हाला आशा वाटते. (वृत्तसंस्था)>कंपनीचा दावाजॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले की, एकाच खटल्यात २२ महिलांनी कंपनीवर गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा आरोप ठेवला. प्रत्येक तक्रारीतील तथ्य वेगळे आहे. तरी या सर्वच जणींना एकसमान भरपाई दिली आहे. या विरोधात कंपनी अपिल करणार आहे.