अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 03:26 PM2020-12-29T15:26:00+5:302020-12-29T15:28:48+5:30

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं.

Joe Bidens digital team includes a Kashmir girl Aisha Shah | अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

Next
ठळक मुद्देकाश्मीरमध्ये जन्मलेल्या आयशाचा अमेरिकेत बोलबालाराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये भारतीय वंशाची मुलगीआयशा शहा हिच्यावर पार्टनरशीप मॅनेजर पदाची जबाबदारी

वॉशिंग्टन
अमेरिकेच्या 'व्हाइट हाऊस'मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रॅटजी टीमची घोषणा करण्यात आली. यात मूळच्या काश्मीर येथे जन्म झालेल्या आयशा शहा हिची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.     

व्हाइट हाऊसमध्ये डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये आयशा शहा हिच्याकडे पार्टनरशिप मॅनेजर पदाची जबाबदारी असणार आहे. बायडन यांच्या या डिजिटल टीमचं नेतृत्व रॉब फ्लेहर्टी करणार आहेत. 

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. काश्मीरमध्ये जन्मलेली आणि सध्या अमेरिकेच्या लुझियानामध्ये स्थायिक असलेली आयशा सध्या स्मिथसोनियन संस्थेसाठी अॅडव्हान्समेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करते. याआधी आयशानं जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या कॉपोरेट फंडावर सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केलं आहे. त्यावेळी तिनं राष्ट्रपतींच्या स्मारकाच्या विस्ताराला पाठिंबा दिला होता. आयशानं बुय येथे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन स्पेशलिस्ट म्हणूनही काम पाहिलं आहे. 

रॉब फ्लेहर्टी नेतृत्व करत असलेल्या डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये आयशासह इतर विविध पदांसाठी तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. यात ब्रेंडन कोहेन (प्लॅटफॉर्म मॅनेजर), महा घंदौर (डिजिटल पार्टनरशिप मॅनेजर), जोनाथन हेबर्ट (व्हिडिओ डायरेक्टर), जैमे लोपेझ (डायरेक्टर ऑफ प्लॅटफॉर्म), कारहाना मॅगवुड (क्रिएटिव्ह डायरेक्टर), अॅबी पिट्झर (डिझाइनर), ऑलिव्हिया रायसनर (ट्रॅव्हलिंग कंटेन्ट डायरेक्टर), रेबेका रिंकेविच (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी), ख्रिश्चन टॉम (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी) आणि कॅमेरुन ट्रिमबल (डायरेक्टर ऑफ डिजिटल एन्गेंजमेंट) यांचा समावेश आहे. 

Web Title: Joe Bidens digital team includes a Kashmir girl Aisha Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.