‘बायडेन फ्रॉम मुंंबई’च्या शोधात जोबायडेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 02:35 IST2020-08-22T02:35:08+5:302020-08-22T02:35:24+5:30
अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष नेहमीच त्या व्यक्तीला ‘बायडेन फ्रॉम मुंबई’ या नावाने संबोधित करतात व त्या व्यक्तीला न भेटल्याबद्दल खेद व्यक्त करतात.

‘बायडेन फ्रॉम मुंंबई’च्या शोधात जोबायडेन
वॉशिंग्टन : अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीतील डेमोक्रॅ टिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे आजही मुंबईतील आपले दूरचे नातेवाईक ‘बायडेन’ यांचा उल्लेख गौरवाने करतात. अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष नेहमीच त्या व्यक्तीला ‘बायडेन फ्रॉम मुंबई’ या नावाने संबोधित करतात व त्या व्यक्तीला न भेटल्याबद्दल खेद व्यक्त करतात.
डेलावेयरमधून १९७२ मध्ये सिनेटर म्हणून निवडले गेलेले बायडेन यांना मुंबईतील त्यांच्याच नावाचे साधर्म्य असलेल्या एकाने पत्र पाठवले होते. सिनेटर होण्यासाठी त्यांना ‘बायडेन फ्रॉम मुंंबई’ने शुभेच्छा दिल्या होत्या व आपण बायडेन यांचे दूरचे नातेवाईक असल्याचे म्हटले होते.
बायडेन हे त्यावेळी २९ वर्षांचे होते व त्या व्यक्तीला भेटणार होते; परंतु कुटुंब व राजकीय व्यग्रतेमुळे ते भेटू शकले नव्हते. आज पाच दशकांनंतरही ते आपली इच्छा पूर्ण करू इच्छित आहेत. ते एखाद्या भारतीय-अमेरिकी किंवा भारतीय नेत्याला भेटतात तेव्हा ते ‘बायडेन फ्र ॉम मुंबई’चा उल्लेख आवर्जून करतात. अमेरिकेचे उपराष्टÑाध्यक्ष झाल्यावर त्यांनी २४ जुलै २००४ रोजी भारत दौºयात मुंबईतील शेअर बाजारात संबोधन दिले होते. त्यावेळीही त्यांनी ‘बायडेन फ्रॉम मुंबई’ची गोष्ट ऐकवली होती. ते म्हणाले होते की, भारतात व त्यातही मुंबईत येणे ही सन्मानाची बाब आहे.
>बायडेन यांचे पूर्वज होते ईस्ट इंडिया कंपनीत
२१ सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिका-भारत बिझिनेस काऊन्सिलला संबोधित करताना बायडेन म्हणाले होते की, ‘बायडेन फ्र ॉम मुंबई’ व माझे पूर्वज एक होते. १८४८ मध्ये ते ईस्ट इंडिया टी कंपनीमध्ये काम करीत होते. त्यांनी कदाचित एखाद्या भारतीय महिलेसमवेत विवाह केला होता व ते भारतातच राहिले होते.