"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:40 IST2025-12-19T20:27:14+5:302025-12-19T20:40:04+5:30
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केलेल्या एपस्टीनच्या नव्या फोटोंमध्ये अल्पवयीन मुलींच्या शरीरावर काहीतरी लिहिल्याचे दिसत आहे.

"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
Epstein Files: पैसे, सत्ता आणि रसूखच्या जोरावर दशकानुशतके अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे साम्राज्य चालवणाऱ्या जेफ्री एपस्टीनचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. अमेरिकेचे न्याय मंत्रालय आज एपस्टीनशी संबंधित सर्व गुप्त फाईल्स सार्वजनिक करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अमेरिकेच्या डेमोक्रॅट खासदारांनी ६८ नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत, ज्यांनी जगाला सुन्न केले आहे.
काय आहे 'लोलिता' कनेक्शन?
प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये व्लादिमीर नोबोकोव यांच्या लोलिता या वादग्रस्त कादंबरीचा संदर्भ वारंवार दिसतो. ही कादंबरी एका प्रौढ पुरुषाचे १२ वर्षांच्या मुलीबद्दल असलेले आकर्षण आणि तिच्या शोषणावर आधारित आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये अल्पवयीन मुलींच्या मान, छाती, पाय आणि पोटावर लोलिता कादंबरीतील ओळी लिहिल्या आहेत. एका फोटोत पीडित मुलीच्या पायाजवळ लोलिता पुस्तकही दिसत आहे.
फोटोंमध्ये नेमके काय लिहिले आहे?
या फोटोंमध्ये कादंबरीतील इंग्रजी ओळींमध्ये She was Lo, plain Lo, in the morning असं लिहिलं आहे. ज्याचा अर्थ ती सकाळी केवळ लो असायची, शाळेत डॉली आणि कागदोपत्री डोलोरेस, पण माझ्या मिठीत ती फक्त लोलिता होती असा आहे. दुसऱ्या एका फोटोत Lo-lee-ta: the tip of the tongue taking a trip असं लिहीलं आहे. ज्याचा अर्थ लो-लि-ता.. एक असे नाव जे घेताना जीभ तोंडात फिरते, जणू एखादी वासना आकार घेत आहे, असा आहे.

शोषणाची विकृत मानसिकता
लोलिता कादंबरीतील हम्बर्ट हे पात्र आपल्या वासनेला शब्दांत गुंफून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करते. जेफ्री एपस्टीननेही अगदी तसेच केले. त्याने मॉडेलिंग, मसाज आणि मेंटरशिप यांसारख्या गोंडस नावाखाली बाल लैंगिक शोषणाचा भयानक धंदा चालवला. दोन्ही प्रकरणांत पीडितेचा आवाज दाबला जातो आणि गुन्हेगाराच्या नजरेतून गोष्ट सांगितली जाते.
दिग्गज नावांचा उल्लेख; पण सहभाग स्पष्ट नाही
या फाईल्समध्ये आणि फोटोंमध्ये जगातील अनेक बड्या हस्तींचा उल्लेख आला आहे. यात प्रामुख्याने बिल गेट्स, नोम चॉम्स्की, वुडी ॲलन, सर्गेई ब्रिन, स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे.