जग हादरले! 'एपस्टीन फाइल्स'मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचा समावेश; अनेकांनी दिले राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 09:46 IST2026-02-09T08:57:43+5:302026-02-09T09:46:52+5:30

Jeffrey Epstein Files : अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध केल्याने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह अनेक देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ईमेल, बैठका आणि आर्थिक संबंध उघड झाल्यामुळे अनेक प्रमुख व्यक्तींनी राजीनामा दिला आहे.

Jeffrey Epstein Files The world was shocked 'Epstein Files' included the most powerful people in the world; A wave of resignations erupted | जग हादरले! 'एपस्टीन फाइल्स'मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचा समावेश; अनेकांनी दिले राजीनामे

जग हादरले! 'एपस्टीन फाइल्स'मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचा समावेश; अनेकांनी दिले राजीनामे

Jeffrey Epstein Files :  मागील काही दिवसापासून कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री 'एपस्टीन फाईल'शी संबंधित कागदपत्रे समोर येत आहेत. या खुलाशांमुळे अनेक देशांमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे. या कागदपत्रांमध्ये ईमेल, सामाजिक संपर्क, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक बैठकांशी संबंधित माहिती उघड झाली आहे. यामुळे अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींना दबावाखाली राजीनामा देण्यास भाग पाडले गेले आहे. काही दिवसापूर्वी ब्रिटन आणि नॉर्वेमध्ये राजीनामे देण्यात आले आहेत.

धक्कादायक! विषारी गीझर गॅसमुळे पतीचा मृत्यू, काही मिनिटांतच पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

ब्रिटनमध्ये, पंतप्रधान केयर स्टारमर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्विनी यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. त्यांनी पीटर मँडेलसन यांची अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत म्हणून शिफारस केल्यानंतर त्यांच्यावर दबाव वाढला. मॅकस्विनी यांनी हा सल्ला चुकीचा असल्याचे मान्य केले आणि त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.

याचा परिणाम नॉर्वेमध्येही जाणवला. वरिष्ठ राजनयिक मोना जुल एपस्टाईनशी संबंधित संबंधांबद्दल "गंभीर चूक" झाल्यामुळे पद सोडणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. ६६ वर्षीय जुल यांनी यापूर्वी मंत्री म्हणून आणि इस्रायल, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये नॉर्वेच्या राजदूत म्हणून काम केले आहे. युरोपमध्ये वाढत्या मोठ्या वादाचा भाग म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

'एपस्टीन फाइल्स'चा अमेरिकेत होणार परिणाम

याचा परिणाम अमेरिकेतही जाणवला. फेब्रुवारी २०२६ मध्ये, एपस्टीनशी असलेले त्यांचे ईमेल संपर्क उघड झाल्यानंतर ब्रॅड कार्प यांनी एका प्रमुख कायदा फर्मच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी, नोव्हेंबर २०२५ मध्ये, लॅरी समर्स यांनीही एपस्टीनशी असलेले त्यांचे संबंध चूक असल्याचे मान्य करून प्रमुख संचालकपदाचा राजीनामा दिला.

डिसेंबर २०२५ मध्ये, एफबीआयचे उपसंचालक डॅन बोन्झिनो यांनीही वादाच्या भोवऱ्यात राजीनामा दिला. त्यांच्या प्रकरणाशी थेट संबंध उघड झाला नसला तरी, फाइल्सभोवतीच्या वादामुळे दबाव वाढला.

युरोपमधील अनेक नेत्यांनीही राजीनामा दिला

'एपस्टीन फाइल्स'चा परिणाम इतर युरोपीय देशांवर झाला. फ्रान्समध्ये माजी मंत्री जॅक लँग यांनी एका सांस्कृतिक संस्थेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. स्लोवाकियामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाजकॅक यांनी ईमेल वादानंतर राजीनामा दिला. स्वीडनमध्येही एपस्टाईनच्या खाजगी बेटाशी संबंधित आरोप समोर आल्यानंतर एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला. प्रत्येक राजीनामा दोषी ठरवल्यामुळे झाला नाही. अनेक प्रकरणांमध्ये, केवळ संबंध उघड केल्याने वाद निर्माण झाला आणि सार्वजनिक दबाव वाढला. अनेक व्यक्तींनी त्यांच्या संस्थांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Web Title : एपस्टीन फाइल्स: शक्तिशाली लोगों के इस्तीफे, विश्व में खलबली

Web Summary : जेफ्री एपस्टीन फाइलों के खुलासे से विश्वभर में इस्तीफों की लहर आ गई है। ब्रिटेन, नॉर्वे और अमेरिका में अधिकारियों ने दस्तावेजों में संबंधों के उजागर होने के बाद पद छोड़ दिए हैं, जिससे सार्वजनिक दबाव बढ़ गया है। कई इस्तीफे विवाद के बीच संगठनात्मक प्रतिष्ठा की रक्षा के लिए हैं।

Web Title : Epstein Files Trigger Global Resignations Among Powerful Figures

Web Summary : The release of Jeffrey Epstein files has sparked resignations across the globe. Officials in Britain, Norway, and the US have stepped down due to connections revealed in the documents, triggering public pressure. Many resignations are to protect organizational reputations amid controversy.